PM Narendra Modi Chhattisgarh Visit: या वर्षाच्या अखेरीस अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये देखील या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी येथे भाजपा आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी छत्तीसगड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी छत्तीसगडमध्ये तब्बल २७ हजार कोटी रुपयांच्या अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. या विकासकामांच्या उद्घाटनांमध्ये बस्तर जिल्ह्यातील नागरनार येथील NMDC स्टील लिमिटेडच्या स्टील प्लांटचा देखील समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद मोदींनी आपल्या दोऱ्याआधी बस्तर जिल्ह्यातील दंतेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान मोदींनी बस्तर जिल्ह्यामधील नागरनार येथे २३,८०० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्चून बांधण्यात आलेल्या स्टील प्लांटचे उद्घाटन केले. NMDC स्टील प्लांट हा एक ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट आहे. जिथे उच्च दर्जाचे पोलाद तयार केले जाणार आहे.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तेलंगणात १३,५०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; म्हणाले, “मला आनंद आहे की…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगदलपूर येथे सभेत बोलत होते. यावेळी मोदी म्हणाले, ”देशातील प्रत्येक भागाचा विकास होईल, तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. आज या ठिकाणी २७ हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीचे विकास प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आले आहेत व अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे.” NMDC स्टील लिमिटेडेच्या नागरनार येथील स्टील प्लांटमध्ये हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. बस्तर जिल्ह्यातील या स्टील प्लांटमुळे या भागातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या आयोजित कार्यक्रमामध्ये बस्तर विभागातील काही रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केला. त्यांनी यावेळी अंतागड ते तारोकी दरम्यानच्या नवीन रेल्वे मार्गाचे आणि जगदलपूर ते दंतेवाडा दरम्यानच्या दोन पदरी रेल्वे लाइनचे उद्घाटन केले.

त्याशिवाय मोदींनी , बोरीडांड-सुरजपूर ही रेल्वे लाइन दोन पदरी करण्याच्या योजनेचे आणि अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जगदलपूर रेल्वे स्टेशनच्या पुर्नविकासाच्या प्रकल्पाचे उदघाट्न केले. तसेच पंतप्रधान मोदींनी तारोकी ते रायपूर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रीय महामार्ग ४३ च्या ‘कुंकुरी ते छत्तीसगड-झारखंड सीमाभागातील रस्ते अपडेट करण्याच्या प्रकल्पाचेही उद्घाटन केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi inaugurates 27000 crore development nmdc steel and road railway projects in chhattisgarh tmb 01