भारतीय शेअर बाजारात शनिवार हा सहसा सुट्टीचा दिवस असतो. पण आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागामध्ये एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केले होते, जेणेकरून मोठ्या अडचणी किंवा बिघाडाला सामोरे जाण्यासाठी त्याची चाचपणी केली जाईल. विशेष ट्रेडिंग सत्रादरम्यान प्राथमिक साइट (PR) वरून आपत्ती निवारण (DR) साइटवर व्यवहार हस्तांतरित करून कार्यक्षमतेची तपासणी केली गेली. सामान्यत: प्राथमिक साइटवर मोठी अडचण किंवा बिघाड झाल्यास व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी DR साइटवर हलविला जातो. दोन्ही शेअर बाजारात दोन सत्रे झाली आहेत. पहिले सत्र PR वर सकाळी ९.१५ ते १० वाजेपर्यंत चालले आणि दुसरे सत्र DR साइटवर सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० पर्यंत सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय शेअर बाजार(BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) या देशांतर्गत शेअर बाजारांनी शनिवारी (२ मार्च) व्यवसायाचे नियोजन (BCP) आणि निर्णय प्रणाली (DRS)साठी SEBI च्या फ्रेमवर्कचा भाग म्हणून विशेष व्यापार सत्राचे आयोजन केले होते. विशेष सत्रांचे उद्दिष्ट शेअर बाजारामधील त्रुटी किंवा व्यत्यय हाताळण्यासाठी स्टॉक एक्स्चेंजची तयारी तपासणे हे होते. सामान्यतः BSE आणि NSE शनिवार आणि रविवारी बंद असतात आणि सोमवार ते शुक्रवार या आठवड्याच्या पाच दिवशी उघडतात.

शेअर बाजाराने विशेष ट्रेडिंग सत्र का आयोजित केले?

बीएसई आणि एनएसई स्टॉक एक्स्चेंजने सांगितले की, त्यांनी प्राथमिक साइट (PR) स्थानापासून आपत्ती निवारण (DR) स्थानापर्यंत व्यापार प्रणालीचे संक्रमण सुरू केले होते. ” शेअर बाजार शनिवारी २ मार्च २०२४ रोजी इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये प्राइमरी साइटवरून आपत्ती निवारण साइटवर स्थानांतरण करीत इंट्राडे स्विच ओव्हरमध्ये एक विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित करीत आहे,” असेही NSE ने यापूर्वी परिपत्रकात म्हटले होते. सेबी आणि त्यांच्या तांत्रिक सल्लागार समितीबरोबरच्या विशिष्ट चर्चेच्या आधारे हे सत्र आयोजित करण्यात आले होते.

SEBI ने BCP आणि DRS साठी मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थे (MIIs)द्वारे स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनसाठी एक फ्रेमवर्क तयार केले आहे. कोणत्याही आउटेजच्या बाबतीत व्यापार हालचाली कशा पद्धतीनं कोणत्याही कारणाशिवाय चालू राहतील, याची खात्री करणे हे फ्रेमवर्कचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त ते डेटा अखंडता राखण्यातदेखील मदत करते.

हेही वाचाः सेन्सेक्स, निफ्टीमध्ये १ टक्क्याची उसळी; नेमके कारण काय?

विशेष ट्रेडिंग सत्रांच्या वेळा काय होत्या?

शेअर बाजाराने दोन टप्प्यात विशेष सत्रे घेतली. भांडवली बाजार विभागासाठी प्राथमिक साइटवर प्री-ओपन सेशन प्राइमरी साइटवर सकाळी ९:०० ते ९:०८ या वेळेत आयोजित करण्यात आले होते आणि बाजाराचे सामान्य सत्र सकाळी ९:१५ ते १०:०० या वेळेत आयोजित करण्यात आले होते. NSE परिपत्रकानुसार, आपत्ती निवारण स्थळावरील प्री ओपन सत्र सकाळी ११:१५ ते ११:२३ पर्यंत आयोजित करण्यात आले होते आणि सामान्य व्यापार सत्र सकाळी ११:३० वाजता उघडले गेले आणि दुपारी १२:३० वाजता बंद झाले आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

हेही वाचाः विश्लेषण : खासदार नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचे प्रकरण काय?

विशेष ट्रेडिंग सत्रांसाठी कोणते प्राइस बँड लागू होते?

सर्व सिक्युरिटीजची (ज्यावर डेरिव्हेटिव्ह उत्पादने उपलब्ध आहेत त्यासह) २ मार्चच्या विशेष व्यापार सत्रासाठी ५ टक्क्यांची कमाल किंमत बँड होती, असेही NSE ने सांगितले. आधीपासून २ टक्के किंवा त्याहून कमी किमतीच्या सिक्युरिटीज संबंधित बँडमध्ये उपलब्ध आहेत, असे त्यात म्हटले आहे. सर्व क्लोज एंडेड म्युच्युअल फंडांसाठी ५ टक्के किंमत बँड लागू होते. सर्व वायदा कराराची दैनंदिन कार्य व्याप्ती ५ टक्के होती.

आपत्ती निवारण स्थळ काय आहे?

आपत्ती निवारण स्थळ (DRS) एक अशी जागा आहे, जिथे स्टॉक एक्सचेंज, कोणत्याही अडचणीच्या बाबतीत तात्पुरते त्याचे कार्य बदलू शकते. डीआरएसमध्ये स्थलांतर केल्याने व्यापारातील सातत्य सुनिश्चित होते, तसेच डेटा आणि व्यवहाराची अखंडता राखण्यात मदत होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why stock market held special trading session today find out vrd