क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. करोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, परिणामी सचिननेही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL सुरू झाल्यापासून बहुतांश वेळा सचिनचा वाढदिवस हा मैदानावर प्रेक्षकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी मार्चच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात IPL चे आयोजन करण्यात येते, त्यामुळे २४ एप्रिलला सचिनचा वाढदिवस IPL मध्येच साजरा होता. पण यंदा मात्र पहिल्यांदाच सचिनचा वाढदिवस IPL शिवाय साजरा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Bcci, मुंबई इंडियन्स आणि देश-विदेशातील विविध खेळाडूंनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडिन्सच्या संघाचे तर सचिनशी विशेष नाते आहे. केवळ १ टी 20 सामना खेळल्यावर टी 20 मधून सचिनने निवृत्ती घेतली पण पुढील अनेक वर्षे तो IPL मध्ये मात्र मुंबईच्या संघातून खेळत राहिला. IPL मध्ये मुंबई इंडियन्स म्हंटलं की सचिन हे समीकरण झालं होतं. पण हा महान खेळाडू IPL मधील मुंबईच्या पहिल्यावहिल्या सामन्यात संघाबाहेर होता. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अगदी पहिल्यावहिल्या IPL सामन्याचा संघ टाकला आहे. विशेष म्हणजे या संघात सचिन तेंडुलकरचा समावेशच नव्हता.

त्या सामन्यात सचिन का नव्हता असा सवाल त्या पोस्ट खाली एक चाहत्याने विचारला. त्यावर मुंबई इंडिनसकडून अधिकृत उत्तर देण्यात आले. सचिन हा दुखापतग्रस्त होता. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता, त्यामुळे तो पहिले सात सामने खेळू शकला नव्हता, असं उत्तर मुंबई इंडियन्सने दिले.

दरम्यान, सचिनच्या अनुपस्थितीत संघाची धुरा हरभजन सिंगकडे होती. तर ल्युक रोंची आणि सनथ जयसूर्या हे दोघे सलामीवीर होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar not included in mumbai indians first ever ipl match click here to know the reason vjb