येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगणार आहे. त्यामुळे आशिया चषकाबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. त्यामुळे तिकीट विक्रीची वेबसाईटही क्रॅश झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्टेडियमवर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या आशिया चषकाची तिकीट सुरू झाली आहे. यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ (platinumlist.net) याठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे घेण्यासाठी चाहत्यांनी सर्वात जास्त प्रतिसाद दिला आहे. वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये ७०हजारांची वाढ झाली. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश झाली.

हेही वाचा – Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय फलंदाज ठरणार वरचढ? शाहीन आफ्रिदीच्या खेळण्याबाबत शंका

दरम्यान, आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर काहीच दिवसांच्या अंतरानंतर टी २० विश्वचषकामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर येतील.

हेही वाचा – “मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. प्रदीर्घकाळाच्या दुखापतीनंतर संघात परतलेल्या केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. राहुल व्यतिरिक्त माजी कर्णधार विराट कोहलीदेखील संघात परतला आहे. टी २० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परत येण्यासाठी आशिया कप विराट कोहलीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 official website gets crash due to high demand of india vs pakistan cricket match tickets vkk
First published on: 16-08-2022 at 11:15 IST