IND vs SA Sanju Samson ICC T 20 World Cup 2022 IPL will only give money and fame says S Sreesanth Reacts | Loksatta

T20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला

ICC T20 World Cup: संजू सॅमसनचे आयपीएलमधील पराक्रम पाहता अलीकडेच बीसीसीआयने संजूला न्यूझीलंडविरुद्धच्या भारत अ संघाचे कर्णधार बनवले.

T20 World Cup: IPL फक्त पैसे व फेम देईल पण.. संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर श्रीसंत स्पष्टच बोलला
ICC T 20 World Cup 2022: संजू सॅमसनला विश्वचषकातून बाहेर ठेवण्यावर एस. श्रीसंत स्पष्टच बोलला (फोटो: ट्विटर)

ICC T 20 World Cup: आगामी T20 विश्वचषक २०२२ संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने अनेक चाहते आणि काही माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते, यानंतर आता मध्यंतरी संजू सॅमसनला उपकर्णधारपद देण्याबाबत चर्चा सुरु होत्या. कर्तबगार असुनही संजूला ऋषभ पंतसारखी संधी मिळाली नाही हे अनेकांना खटकले होते. मात्र निवड समिती यष्टीरक्षक बदलण्याच्या विचारात दिसत नसल्याने संजूला आता फलंदाज म्हणून संघात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्याला अनेकांनी दिला आहे .

संजू सॅमसनचे आयपीएलमधील पराक्रम पाहता अलीकडेच बीसीसीआयने संजूला न्यूझीलंडविरुद्धच्या भारत अ संघाचे कर्णधार बनवले. यावरून अंदाज येतो की संजूच्या खेळावर काही शंका नसली तरी संघाच्या बांधणीला बघता त्याला स्थान देणे विसंगत ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर संजूचे नाव चर्चेत असताना भारताचा माजी गोलंदाज श्रीसंत याने संजूवर भाष्य केले आहे.

विश्वचषक विजेता एस श्रीसंतने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना सांगितले की “ संजूने सातत्य राखले पाहिजे. त्याच्या आयपीएलमधील खेळाबद्दल सर्वच बोलत आहेत. मी केरळचा आहे, मी अशी व्यक्ती आहे ज्याने त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी त्याला U14 पासून खेळताना पाहिले आहे. तो माझ्या हाताखाली खेळला आहे. मीच त्याला त्याच्या रणजी ट्रॉफी पदार्पणाची कॅप दिली होती. पण मला वाटत त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळण्याच्या दृष्टीने कामगिरी करायला सुरुवात करावी”.

India T-20 Wins in 2022: ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि पाकिस्तानला दणका; टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम

श्रीसंत पुढे म्हणाला की, आयपीएल खूप महत्त्वाचं आहे. IPL त्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि संपत्ती देईल. पण कोणत्याही क्रिकेटपटूसाठी – त्यांना राज्य संघासाठी, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. केवळ शतक नाही तर २०० धावा करा. या आणि केरळ संघाला रणजी करंडक जिंकून द्या! केरळ संघाला विजय हजारे करंडक जिंकून द्या. त्यानंतर केरळचे क्रिकेटपटू अव्वल स्थानावर येतील.”

दरम्यान, संजू आयपीएलमध्ये खेळतोय, त्याचे खूप कौतुक आहेच. जगभरातील मल्याळम भाषिक लोक त्याला पाठिंबा देत आहेत असेही पुढे श्रीसंत म्हणाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : केनियाचा किपचोगे कशा प्रकारे ठरतो मॅरेथॉन शर्यतींचा बादशहा?

संबंधित बातम्या

नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”
IND vs BAN Test Series: ‘हा’ गोलंदाज असणार मोहम्मद शमीचा बदली खेळाडू; १२ वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन
FIFA WC 2022: फिफा विश्वचषक कव्हर करताना अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू, LGBTQ च्या समर्थनार्थ इंद्रधनुष्य टी-शर्ट घातला
Fifa World Cup 2022: मेस्सीने रचला इतिहास; पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडचा पराभव करत अर्जेंटिना उपांत्य फेरीत
विश्लेषण: पोर्तुगाल संघातून ख्रिस्तियानो रोनाल्डोला का वगळले? रोनाल्डोच्या कारकीर्दीची ही अखेर समजावी का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये जिंकलात पण हिमालचमध्ये पराभव का झाला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण, म्हणाले “नशीबाने…”
‘समृद्धी’चं उद्घाटन करताना मोदी आम्हालाही टोमणे मारतील, पण…”, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला!
“ज्यांच्याकडे मतदारसंघ सुद्धा स्वतःच्या हक्काचा नाही त्यांना…”; ‘भीक मागितली’ वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
“अश्लील हावभाव व अंगप्रदर्शन…” सध्याच्या लावणी प्रकाराबाबत ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांनी केलं होतं भाष्य
राणादा-पाठक बाईंपाठोपाठ ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, म्हणाली…