Virat Kohli has withdrawn his name from the first two matches : भारतीय संघाला २५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. गुरुवारपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या ३ दिवस आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटने नाव का मागे घेतले?

विराट कोहलीने आपले नाव का मागे घेतले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. विराटने वैयक्तिक कारणांमुळे नाव मागे घेतल्याचे बीसीसीआयने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितले आहे. टीम इंडियाचा संघ फक्त पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर करण्यात आला होता. आता विराटच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. त्याचबरोबर तिसर्‍या कसोटीत विराट पुनरागमन करतो की नाही, हेही पाहावे लागेल.

विराटची जागा कोण घेणार?

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे प्राधान्य असल्याचे विराटने सांगितले असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. पण सध्या तो अशा वैयक्तिक परिस्थितीत आहे की त्याला माघार घ्यावी लागली. या कारणास्तव तो पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर असेल. बोर्डाने मीडिया आणि चाहत्यांना विराटच्या गोपनीयतेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने अद्याप बदलीची घोषणा केलेली नाही. पण तिलक वर्माची रणजीमधील कामगिरी लक्षात घेता तो टीम इंडियात सामील होऊ शकतो.

हेही वाचा – IND vs ENG : ‘विराटचा अहंकार…’, माँटी पानेसरने किंग कोहलीला आऊट करण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना दिला गुरुमंत्र

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has withdrawn his name from the first two matches of the test series against england vbm
First published on: 22-01-2024 at 15:42 IST