Sleeping in on weekends can reduce heart disease risk: झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप घेणं फारच अवघड झालं आहे. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला लोक बळी पडत आहेत. दरम्यान, एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, आठवड्याभरातली अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदयविकाराचा धोका २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबईचे डॉक्टर राजीव भागवत यांनी या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

चीनमधील स्टेट की लॅबोरेटरी ऑफ इन्फेक्शियस डिसीजने केलेल्या १४ वर्षांच्या संपूर्ण अभ्यासानुसार, आठवड्याच्या शेवटच्या दिवसात जास्त तास झोपल्याने तुमच्या शरीराला झालेल्या झोपेच्या कमतरतेची भरपाई होऊ शकते, असे संशोधकांना आढळून आले आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी झोप का आवश्यक आहे

झोप म्हणजे तुमचे शरीर विश्रांती घेते आणि स्वतःची दुरुस्ती करते. झोपेत असताना एखाद्या व्यक्तीचे हृदय गती आणि रक्तदाब कमी होतो, कारण त्यांचा श्वास स्थिर आणि नियमित होतो. याशिवाय तुम्ही जितके कमी झोपता, तितका तुमचा ताण सक्रिय असतो.

आठवड्याच्या शेवटी झोपणे खरोखर शक्य आहे का?

आठवड्याच्या शेवटी खूप वेळ झोपून झोप पूर्ण करणं तसं शक्य नाहीये. कारण तुमची झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी आठवड्याच्या शेवटी खूप तासांची झोप लागते. २०२३ मधील नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, तासभराची कमी झोप भरून काढण्यासाठीही नंतर बराच वेळ लागतो. त्यामुळे दर आठवड्याला पाच दिवसांच्या झोपेची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला आठवड्याच्या शेवटी ४८ तासांपेक्षा जास्त वेळ लागेल.

हेही वाचा >> ‘मैने प्यार किया’फेम भाग्यश्री म्हणते, “न सोललेल्या बटाट्यांमुळे कमी होतो क्रॅम्प्सचा त्रास” खरंच हे शक्य आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

याशिवाय झोपेची वेळही सुनिश्चित करणं गरजेचं आहे. जर तुम्ही उशिरा उठलात, तर तुम्ही उशिरा झोपाल आणि सोमवारची सकाळची झोप कमी कराल, जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असेल; त्यामुळे प्रथम झोपेची कमतरता टाळा आणि कमीत कमी सहा ते सात तास झोपण्याचा प्रयत्न करा. संध्याकाळी उशिरा चहा, कॉफी आणि साखर यांसारखे उत्तेजक पदार्थ टाळा. तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही गरम दूध, मल्टीग्रेन रोटी आणि अंडी यांचा समावेश करू शकता, कारण ते स्लीप हार्मोन मेलाटोनिनच्या नियमनात मदत करते. आहार आपल्याला झोपेचे वेळापत्रक राखण्यास मदत करू शकतो.