Dasara Melava: १७९५ बसेससाठी १० कोटी कुणी भरले? कागदोपत्री तपशील देत अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल | Ambadas danve on 10 crore deposit to book 1795 st buses eknath shinde dasara melava rmm 97 | Loksatta

Dasara Melava: १७९५ बसेससाठी १० कोटी कुणी भरले? कागदोपत्री तपशील देत अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल

अंबादास दानवे यांनी कागदोपत्री तपशील देत शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत.

Dasara Melava: १७९५ बसेससाठी १० कोटी कुणी भरले? कागदोपत्री तपशील देत अंबादास दानवेंचा शिंदे गटाला सवाल
संग्रहित फोटो

मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातील हजारो लोक उपस्थिती होते. या लोकांना सभास्थळी आणण्यासाठी शिंदे गटाकडून तब्बल १७९५ एसटी बसेस आरक्षित केल्या होत्या. यासाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

अंबादास दानवे यांनी कागदोपत्री तपशील देत सांगितलं की, शिंदे गटाकडून सुमारे १७९५ एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी मुंबई आगार व्यवस्थापकाकडे सुमारे ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरुपात जमा करण्यात आले होते. ही रक्कम ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भरल्याचं मी सांगतोय. पण ते (शिंदे गट) नाकारतील. दसरा मेळाव्यानिमित्त १७९५ पैकी १६२५ बसेसचा वापर करण्यात आला. तर १७० बसेस रद्द झाल्या, असंही अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा- “सनी देओल बेपत्ता आहे” लोकांनी शहरभर लावले पोस्टर, नेमकं काय घडलं?

मुंबई आगार व्यवस्थापकाकडे ही रक्कम कुणी भरली? याची एसटीने कुठे विचारपूस केली का? असा माझा प्रश्न आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे ११ लाखांची रोख रक्कम आढळली होती, तर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे आता एवढी मोठी रोख रक्कम भरणारी व्यक्ती समोर आली पाहिजे. ही रक्कम कोणी भरली? त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? याची माहिती मी मागवली आहे, असंही दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अलिबाग : रानडुकराची शिकार करणाऱ्यांना पकडले ; साळोखवाडी वनविभागाने केली यशस्वी कारवाई

संबंधित बातम्या

VIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…”
VIDEO: बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना २८८ पैकी १०० जागांपर्यंत पोहचू शकले नाहीत – संजय गायकवाड
‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…
“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
Maharashtra News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: मॅव्ह..मॅव्ह..करत मांजरीने हाक मारली, कावळ्याने दिला भन्नाट प्रतिसाद, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
विश्लेषण : ‘मंदौस’ चक्रीवादळ धडकणार; जाणून घ्या, कुठे आणि काय होणार परिणाम?
“घटस्फोटासाठी लग्नानंतर एक वर्ष होणं आवश्यक नाही”, केरळ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
“भुंकणारे कुत्रे आणि ते संजय राऊतांचे…” ठाकरे गटाच्या नेत्यावर संजय शिरसाटांचं टीकास्र!
Maharashtra-Karnataka Border Dispute : “गृहमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज; अशावेळी केंद्र जर मूग गिळून गप्प बसत असेल, तर…” – अंबादास दानवेंचं विधान!