दादागिरीने तुम्ही मन, ह्रदय, लोकांना जिंकू शकत नाही अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. कर्जतमधील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. “आज तुम्ही हिंदुत्व, शिवसेना, शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्याबाबत बोलत आहात. हीच हिंमत, निष्ठा असती; शिवसेनेचे रक्त असतं, जे दिलं आहे त्याची खात्री असती तर तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला असता,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! उद्धव ठाकरे आज देणार होते राजीनामा, शरद पवारांनी थांबवलं

VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

पुढे बोलताना ते म्हणाले की, “घाबरायचं तर किती..येथून सुरतला पळून जायचं. तिथून नितीन सरदेशमुख आणि कैलास पाटील हे आपले शूरवीर शिवसैनिक लढा देऊन परत आल्यानंतर नंतर गुवाहाटीला पळाले. आधी कोणाला गुवाहाटी माहिती नव्हतं, आता सर्वांना माहिती आहे. एक आमदार म्हणतो काय डोंगर, दरी, नद्या…डोंगर, दरी, नदी पहायची असेल आमच्या सह्याद्रीला येऊन बघा. आमच्या कर्जतला येऊन पहा”.

Maharashtra Political Crisis: ४० आमदारांचे मृतदेह येतील वक्तव्यानंतर संजय राऊतांचं नवं ट्वीट; म्हणाले “चालते फिरते मुडदे…”

“त्यांचा काय मान, सन्मान होता. आज इथे असते तर माझ्या बाजूला बसले असते. मातोश्रीवर असते तर शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसले असते. पक्षात आपण त्यांना दोन नंबरची जागा दिली होती. इतका मान, सन्मान, प्रेम मिळत होतं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पाहा आमदार शहाजीबापू पाटील यांचा व्हिडीओ –

“सूरतमधून विमानाने गुवाहीटाला नेतानाचे दोन तीन व्हिडीओ आले आहेत. व्हिडीओत काही जण डुलत होते, ते कशामुळे मला माहिती नाही. पण दुसरा व्हिडीओ फार भयानक होता. जे आमदार गेले आहेत किंवा अपहरण करुन नेलं आहे त्यांना कैद्यासारखं हाताला, मानेला पकडून नेलं आहे याचं मला दु:ख वाटतं,” असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“महाराष्ट्रातील आमदाराचे सूरतमध्ये, गुवाहाटीला असे हाल होतात. याच्या मागे कोण आहे. कोणती अदृश्य शक्ती, पक्ष आहे का? जे बोलतात पुन्हा येईन ते आहेत का? पण कोणीही यामागे असलं तरी महाराष्ट्र माफ करणार नाही, थांबणार नाही, झुकणार नाही,” असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis shivsena aditya thackeray eknath shinde mahavikas aghadi sgy
First published on: 28-06-2022 at 08:33 IST