येत्या दिवाळीत अक्षय कुमारचा 'राम सेतु' प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच पाहायला मिळणार चित्रपटाची पहिली झलक | akshay kumar next movie ram setu first look to be released today afternoon | Loksatta

येत्या दिवाळीत अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच पाहायला मिळणार चित्रपटाची पहिली झलक

तरण आदर्श यांनी चित्रपटाचं पोस्टर ट्वीट करत ही बातमी दिली आहे.

येत्या दिवाळीत अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच पाहायला मिळणार चित्रपटाची पहिली झलक
राम सेतु चित्रपट | ram setu movie

खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले चित्रपट सपशेल आपटले आहेत. बॉयकॉट ट्रेंडमुळे अक्षयच्या चित्रपटांना चांगलाच फटका बसला आहे. आता अक्षय पुन्हा एक नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सिनेअभ्यासक आणि तज्ञ तरण आदर्श यांनी याविषयी खुलासा केला आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘राम सेतु’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तरण आदर्श यांनी चित्रपटाचं पोस्टर ट्वीट करत ही बातमी दिली आहे. येत्या दिवाळीला म्हणजेच २५ ऑक्टोबरला ‘राम सेतु’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच या चित्रपटाची पहिली झलक आज दुपारी बघायला मिळेल असंही त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आज दुपारी १२ वाजता या चित्रपटाची पहिली झलक, टीझर किंवा मोशन पोस्टर आपल्याला बघायला मिळू शकतं.

कालच जागतिक कन्या दिनानिमित्त अक्षय कुमारनेही तिच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिच्याबद्दल एक भावून पोस्टही त्याने ट्विटरवर शेअर केली होती. याच ट्वीटमध्ये त्याने प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे अक्षयच्या ट्वीटपासूनच लोकांना त्याच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

आणखी वाचा : आर. बाल्की यांना अशी सुचली होती ‘चूप’ची कथा, दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा

अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा याने केले असून त्याने याअगोदर ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘परमाणु’सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘राम सेतु’मध्ये अक्षयबरोबर नुशरत भरूचा आणि जॅकलीन फर्नांडिस या अभिनेत्रीसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या नावावरून आणि एकूणच संकल्पनेवरुन मध्यंतरी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता पण आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
रोजंदारीवर काम करणारी वर्षा ठरली ‘DID Super Mom’s’ची विजेती; जाणून घ्या तिचा प्रवास व बक्षिसाची रक्कम

संबंधित बातम्या

“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
स्वप्निल जोशीने झोमॅटो अ‍ॅपबद्दल केली तक्रार, ट्वीट करत कंपनी म्हणाली “यावर उपाय…”
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
‘काश्मीर फाइल्स’वरील टीकेनंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, अनुपम खेर म्हणाले, “हिंसक होती, मनात आलं की…”
‘रौंदळ’मधील ‘मन बहरलं..’ गाणं प्रदर्शित

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA WC 2022: दिग्गज मॅराडोनाचा मेस्सीने मोडला विक्रम! ऑस्ट्रेलियावर मात करत अर्जेंटिना पोहचली क्वार्टर फायनलमध्ये
IND vs BAN 1st ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन
विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?
Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…