अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर | Amey Wagh Vs Sumeet Raghwan facebook war know the real reason behind it nrp 97 | Loksatta

अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

अमेय वाघ आणि सुमीत राघवन एकमेकांसमोर उभे असून पंजा लढवताना दिसत आहे.

अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून अमेय वाघ आणि सुमीत राघवन या दोघांना ओळखले जाते. ते दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. मात्र अवघ्या दोन दिवसांपूर्वी या दोघांमध्ये फेसबुक वॉर पाहायला मिळाले. ते दोघेही त्यामुळे चर्चेत आले होते. अमेय वाघ आणि सुमीत राघवन यांच्यात वाद सुरु होते. या दोघांच्या फेसबुक पोस्टने आणि एकमेकांवरील टीकांमुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. हा वाद नेमका कशावरुन सुरु आहे? याचा अखेर उलगडा झाला आहे.

अमेय वाघ याने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे यामागचा उलगडा झाला आहे. अमेयने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमेय वाघ आणि सुमीत राघवन एकमेकांसमोर उभे असून पंजा लढवताना दिसत आहे. पडद्यामागे आहे पक्की दोस्ती, पडद्यासमोर रंगणार मनोरंजनाची कुस्ती, असे या फोटोवर लिहिण्यात आले आहे.
आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

याला कॅप्शन देताना अमेय वाघ म्हणाला, “झी मराठी अवॉर्ड २०२२ येतोय तुमच्या भेटीला लवकरच …यावेळी पाहायला मिळणार दोन मित्रांचं एक आगळं वेगळं युद्ध तर मग तयार व्हा या भन्नाट अनुभवासाठी….” अमेय वाघने शेअर केलेली ही पोस्ट काही सेकंदात व्हायरल झाली आहे.

अमेयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला ट्रोल केले आहे. तुला चांगल्या सोशल मीडिया मॅनेजरची गरज आहे अमेय. जो तुला चांगले फंडे देईल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने राघू मैना …नाही नाही राघू वाघू, अशी कमेंट केली आहे. लोकांना धंद्याला लावून प्रमोशन चे फंडे करत होतात, पब्लिक च्यू नाही, सगळं माहित होतं, आता खरोखर वाघमारे सोडावा लागतोय मागे, अशी कमेंट एकाने केली आहे.
आणखी वाचा : “वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ 

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता अमेय वाघने रविवारी (२५ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने “जंगलात राघू (सुमीत राघवन) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी”, अशी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने सुमीत राघवनला टॅग केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सुमीत राघवननेही अमेयच्या या पोस्टवर रिप्लाय केला. “सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय…कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी”, अशी कमेंट सुमीतने केली.

विशेष म्हणजे यात त्याने अमेय वाघला टॅग केले. त्यानंतरच यांच्या वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळाली. यानंतर अमेय वाघने “वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय” अशी खोचक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सुमीतला टॅग केले. त्यावर उत्तर देताना सुमीत राघवन म्हणाला, “अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे…आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.” “प्रकरण कितीही गंभीर असलं तरी मी तेवढाच खंबीर आहे”, असे म्हणते अमेयने सुमीतला स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर दिले.

त्यावर सुमीत राघवन म्हणाला, “एक असतो कॉन्फिडन्स, मग असतो ओव्हर कॉन्फिडन्स आणि मग येतो अमेय वाघ…!” यावर उत्तर देताना अमेय वाघने “कोण किती पाण्यात आहे ते बघूच ना उद्या संध्याकाळी !!! सुमीत राघवन आता #लागलीपैज” असे म्हटले आहे. तर सुमीत राघवननेही त्याला प्रत्युत्तर देत “अमेय वाघ पाण्यात राहून माशाशी आणि इंडस्ट्रीमध्ये राहून माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…बघू उद्या संध्याकाळी कोण वरचढ ठरतं…आता तर #लागलीपैज” असे म्हटले आहे. दरम्यान अमेय वाघ आणि सुमीत राघवन यांच्यातील या फेसबुक वॉरची रविवारी दिवसभर चर्चा पाहायला मिळाली. त्या दोघांच्या फेसबुक पोस्टने आणि एकमेकांवरील टीकांमुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“महेश भट्ट यांनी मला बॉलिवूड आणि देश…” त्यांच्याच चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीच्या आरोपांमुळे उडाली होती खळबळ

संबंधित बातम्या

‘अवतार २’ बघताना प्रेक्षकांनी टॉयलेटला कधी जावं? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचं भन्नाट उत्तर
राजामौलींच्या ‘त्या’ वक्तव्याने मी दुखावलेय- श्रीदेवी
VIDEO : कतरिना रणबीरला म्हणतेय ‘माझ्या डोळ्यात बघ’
PHOTO : ‘बिग बॉस’ फेम नितिभासोबत सुहानाचा ‘पार्टी टाइम’
भारतातील पहिला महिला कॉमेडी शो

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला!
कर्नाटकने डिवचले तरीही, जतमधील राजकारणी श्रेयवादात दंग
राज्यात पाच हजार बायोगॅस संयंत्रे उभारणार; केंद्राच्या योजनेचा कोल्हापूर, पुणे, नगरला सर्वाधिक लाभ
India Bangladesh ODI Series: भारताला विजय अनिवार्य!
रेशीम उद्योगातून उन्नतीचा ‘धागा’!; अमरावतीत विदर्भातील पहिला रेशीम बाजार