Vikrant Massey Baby Boy: ’12th Fail’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विक्रांत मेस्सी काही दिवसांपूर्वी बाबा झाला. ७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तेव्हापासून विक्रांतचे चाहते त्याच्या चिमुकल्या लेकाला पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर अभिनेत्याने आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. पहिल्या फोटोमध्ये विक्रांत फिकट गुलाबी रंगाचा कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर पत्नी त्याला मॅचिंग अशा फिटक गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. दोघं आपल्या चिमुकल्या लेकाबरोबर खेळताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी मुलाचं नाव जाहीर केलं आहे. विक्रांत व शीतलच्या मुलाचं नाव वरदान असं ठेवलं आहे. वरदानचा अर्थ आशीर्वाद असा होता.

हेही वाचा – पूजा सावंत लवकरच अडकणार लग्नबंधनात; संगीताची जोरदार तयारी झाली सुरू, पाहा फोटो

हे फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कुठल्याही आशीर्वाद पेक्षा कमी नाही….आम्ही त्याचं नाव वरदान ठेवलं आहे.” सोशल मीडियावर विक्रांतीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहते शुभेच्छा देत आहेत.

काही दिवसांपूर्वी विक्रांत ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ शोमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा त्याने टेलिव्हिजन का सोडलं? यामागचं कारण सांगितलं. तो म्हणाला की, जेव्हा छोटा पडदा सोडून मोठ्या पडद्यावर नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्याकडे महिन्याला ३५ लाखाचा करार होता. पण त्याने तो करार नाकारला. कारण त्याला टेलिव्हिजनवर काम करून समाधान मिळतं नव्हतं. यामुळे अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये पाय ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला.

हेही वाचा – प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने लग्नाच्या काही तासांपूर्वी शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “सासरी रमेपर्यंत…”

दरम्यान, विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तो एकता कपूरच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात झळकणार आहे. ३ मे २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘सेक्टर ३६’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या चित्रपटांमध्ये विक्रांत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12th fail fame actor vikrant massey revealed his son face and name pps
First published on: 24-02-2024 at 10:30 IST