Premium

२०व्या वर्षी केसगळतीमुळे अक्षय खन्नाने करिअरमधून घेतलेला ब्रेक; स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला “टक्कल पडल्यामुळे…”

अभिनेता अक्षय खन्नाचा आज ४८वा वाढदिवस आहे.

akshay khanna birthday special
अक्षय खन्नाचा आज ४८वा वाढदिवस आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नाचा आज ४८वा वाढदिवस आहे. ‘दिल चाहता है’, ‘ताल’, ‘हंगामा’, ‘मेरे बाप पहले आप’, ‘रेस’ यांसारख्या चित्रपटातून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’ या अजय देवगणच्या चित्रपटात अक्षय महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. परंतु, अक्षय काही काळ मनोरंजनविश्वापासून दूर होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अक्षय खन्नाला वयाच्या १९-२० वर्षातच केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं. यामुळे त्याने आत्मविश्वासही गमावला होता. २००७ साली ‘कॉफी विथ करण’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्नाने याबाबत खुलासा केला होता. “१९-२०व्या वर्षीच मला केसगळतीची समस्या जाणवू लागली होती. एवढ्या कमी वयात टक्कल पडत असल्यामुळे मी माझा आत्मविश्वा गमावून बसलो होतो. एखाद्या पियानो वादकाला त्याची बोट कापल्यावर जशा वेदना होतील, तशा मला होत होत्या”, असं अक्षय म्हणाला होता.

हेही वाचा>> “…म्हणून मी लग्न केलं नाही”; अभिनेता अक्षय खन्ना सांगितलं अविवाहित राहण्यामागचं कारण

“नंतर याकडे मी लक्ष देणं सोडून दिलं. हे खरंच खूप चिंता वाढवणारं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरमधील महत्त्वाची दोन वर्षे गमावू शकता. सुंदर दिसणं एका अभिनेत्यासाठी महत्त्वाचं असतं. यामुळे मी निराश झालो होतो. ही भावना तुम्हाला अधिक कमजोर करते. टक्कल पडल्यामुळे मी तारुण्यातच माझा आत्मविश्वास गमावून बसलो. या गोष्टीचा माझ्यावर खूप जास्त परिणाम झाला होता”, असंही अक्षय खन्नाने सांगितलं होतं.

हेही वाचा>> हनिमूनसाठी गेलेल्या टीव्ही अभिनेत्रीने खाल्ली तब्बल १८०० रुपयांची मॅगी, पती फोटो शेअर करत म्हणाला…

अक्षय खन्ना हा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. ‘हिमालय पुत्र’ या सिनेमातून अक्षयने बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यानंतर केसगळतीच्या समस्येमुळे त्यांनी करिअरमधून दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. २००१ साली ‘दिल चाहता है’ चित्रपटातून त्याने पुन्हा कमबॅक केलं. २०१२ साली अक्षयने पुन्हा चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. २०१६ साली ‘ढिशूम’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:45 IST
Next Story
प्रियंका च्रोपाने चिमुकल्या लेकीला दिल्या मेकअप टिप्स? फोटो शेअर करत म्हणाली…