राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ; आदिलची गर्लफ्रेंड तनु नेमकी आहे तरी कोण? | rakhi sawant finally open up about adil khan girlfriend who is tanu | Loksatta

राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात वादळ; आदिलची गर्लफ्रेंड तनु नेमकी आहे तरी कोण?

राखी सावंतने अखेर केला पती आदिल खानच्या गर्लफ्रेंडच्या नावाचा खुलासा

who is tanu chandel, who is adil khan durrani girlfriend, rakhi sawant tanu, adil khan tanu chandel rakhi sawant, adil khan durrani tanu chandel, adil khan durrani girlfriend, राखी सावंत, आदिल खान, आदिल खान गर्लफ्रेंड, राखी सांवत पती, तनु, कोण आहे तनु, कोण आहे आदिल खानची गर्लफ्रेंड?
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप लावला होता. आदिलची कोणीतरी गर्लफ्रेंड असल्याचं काही दिवसांपूर्वीच राखीने म्हटलं होतं. वैवाहिक आयुष्यातील या गोष्टी सुधरल्या नाहीत तर मी आदिलच्या गर्लफ्रेंडचं नाव सार्वजनिक करेन आणि तिचे फोटो व्हिडीओ सर्वांसमोर आणेन असंही राखीनं म्हटलं होतं. त्यानुसार आता तिने आदिल खानची पोलखोल केली असून आदिलचं अफेअर ज्या मुलीबरोबर आहे ती मुलगी तनु असल्याचं राखीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ही तनु नेमकी कोण याबाबत सगळेच उत्सुक आहेत.

राखी सावंतने आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नाव तनु आहे असं सांगितलं आहे. राखी जेव्हा मराठी बिग बॉसमध्ये होती त्यावेळी या दोघांचं अफेअर सुरू झाल्याचं राखीने सांगितलं आहे. पाच आठवड्यांनंतर जेव्हा ती बिग बॉसच्या घरातून बाहेर आली तेव्हा तिला याबद्दल समजलं. दरम्यान तिने त्यानंतर आदिलला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्याच वेळी तिची आई आजारी होती. पण राखीच्या म्हणण्यानुसार अदिलने तिचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही. त्यानंतर आता राखीने त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सर्वांसमोर जाहीर केलं.

आणखी वाचा- राखी सावंतकडून आदिल खानच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट, पहिला फोटोही आला समोर

सोशल मीडियावर सध्या तनु आणि आदिल यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार तनु मूळची इंदौरची आहे. त्या ठिकाणी आदिलचा एक फ्लॅट आहे. त्याची एक बीएमडब्ल्यू कारही त्या ठिकाणी आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार तनु आयआयटी पासआउट आहे आणि आता एक बिझनेसवूमन आहे. मागच्या ८ वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत आहे. तिने काही लहानमोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. तिचं वय ३७ वर्ष आहे.

आणखी वाचा- “माझी आई तुझ्यामुळे गेली” राखी सावंतचे पती आदिल खानवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने आईच्या उपचारासाठी…”

दरम्यान तनुचं पूर्ण नाव काय आहे याचा खुलासा राखीने केलेला नाही मात्र सोशल मीडियावर जे काही फोटो व्हायरल झाले आहेत त्यावरून तनुचं पूर्ण नाव तनु चंडेल असल्याचं बोललं जात आहे. ती एक टिकटॉकर आहे. निवेदिता चंडेल हे तिचं खरं नाव आहे. आदिला खानही तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:18 IST
Next Story
“ती गोष्ट करण्याचा विचार नव्हता पण…” सिद्धार्थ मल्होत्राचा बॉलिवूडमधील करिअरबद्दलचा मोठा खुलासा