Sharad kelkar wii be dubbing for prabas next film rnv 99 | प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला 'हा' मोठा निर्णय | Loksatta

प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

प्रभासची इच्छा असूनही त्याला ‘बाहुबली’नंतर बॉलिवूडमध्ये यश कमावता आलं नाही.

प्रभासचे हिंदी चित्रपट आपटल्याने निर्मात्यांना पुन्हा आली शरद केळकरची आठवण, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये प्रभास श्री रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात प्रभासला श्री रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणी यावरून असे समोर आले की, शरद केळकर प्रभासचा बॉलिवूडमधील आवाजाच्या रूपात परत आला आहे.

आणखी वाचा : Video: करीना कपूरबरोबर घडली धक्कादायक घटना, एकाने केला खांद्यावर हात टाकण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्याने…

शरद केळकरच्या आवाजाने प्रभासला संपूर्ण भारताचा स्टार बनवले. पण नंतर प्रभासच्या सगळ्या हिंदी चित्रपटांचे डबिंग त्याने स्वतः केले. त्याचा परिणाम असा झाला की, प्रभासचे ते सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. प्रभासची इच्छा असूनही त्याला ‘बाहुबली’नंतर बॉलिवूडमध्ये यश कमावता आलं नाही. अशा परिस्थितीत आता चित्रपट निर्मात्यांना प्रभासच्या हिंदी आवाजासाठी पुन्हा एकदा शरद केळकरचीच आठवण झाली. प्रभासला बॉलिवूडमध्ये चमकायचे असेल तर शरद केळकरशिवाय पर्याय नाही हे निर्मात्यांना समजले आहे.

एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’च्या हिंदी व्हर्जनमध्ये शरद केळकरने प्रभासला आवाज दिला होता. संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ने बॉक्स ऑफिसवर केवळ विक्रमच केले नाहीत तर, प्रभासला संपूर्ण भारतात स्टार बनवले. याचाच अर्थ प्रभासला बॉलीवूडचा स्टार बनवण्यात शरद केळकरचीही महत्त्वाची भूमिका होती. पण ‘बाहुबली’ हिट होण्यामागे प्रभासचे स्टारडम आणि बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी खेचण्याची त्याची क्षमता हे कारण असल्याचे म्हटले जात होते.

प्रभासला संपूर्ण भारतातील सुपरस्टार बनवण्यात शरद केळकरचाही वाटा असल्याचे मान्य करण्यास निर्मात्यांनी नकार दिला. याच कारणामुळे ‘बाहुबली’नंतर साऊथ चित्रपट निर्मात्यांनी प्रभाससोबत बनवलेले ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ हे दोन पॅन इंडिया चित्रपट चांगलेच अपयशी झाले. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी प्रभासच्याच आवाजात हिंदी व्हर्जन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : ठरलं! ‘हर हर महादेव’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका, समोर आली पहिली झलक

परिणामी, जेव्हा ‘साहो’ आणि ‘राधे श्याम’ रिलीज झाले तेव्हा प्रेक्षकांनी प्रभासचे हिंदी आणि त्याची संथ संवादफेक यावर टीका केली. प्रभासने हिंदी चित्रपटांसाठी डबिंग करावे, असे सर्वांचे म्हणणे होते. पण दोनदा चित्रपट अपयशी झाल्यावर प्रभासचा आवाज हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांची गर्दी खेचू शकत नाही हे आता सर्वांनाच समजले. त्यामुळेच ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी प्रभासचा हिंदी आवाज म्हणून लगेचच शरद केळकरला निश्चित केले. या चित्रपटात श्री रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासला पुन्हा एकदा शरद केळकरने आवाज दिला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सैफ अली खानचा ‘रावण’ पाहून प्रेक्षकांचा राग अनावर, कुणी तैमूरशी तर कुणी खिलजीशी केली तुलना

संबंधित बातम्या

“माझ्या कुत्र्यालाही तुझी कथा आवडलेली नाही…” प्रसिद्ध अभिनेत्याने केला होता सलीम खान यांचा अपमान
“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य
क्रिती सेनॉन होणार प्रभासची बायको? त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत म्हणाली…
Video : पार्टीत दारूने भरलेले ग्लास, टेबलावर चढून नाचली अन् आता बिकिनी परिधान करत केला डान्स, सुप्रसिद्ध गायिकेचे व्हिडीओ व्हायरल
Video : आधी अंगठी घातली, नंतर किस केलं…; आमिर खानच्या लेकीच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पाहिलात का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अरबाजच्या गर्लफ्रेंडचं मलायका अरोराशी कसं आहे नातं? जॉर्जिया म्हणते, “माझ्यासाठी ती अशी व्यक्ती…”
भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना
“नट विस्मरणात जातो पण…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर अभिनेत्रीने शेअर केला ‘नटसम्राट’मधील व्हिडीओ
राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही
‘महाभारत’मध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला १३ लाखांचा गंडा; आरोपी पोलिसांच्या ताब्यात