Shatrughan sinha expressed his views about current bollywood situation rnv 99 | "प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही...", शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत | Loksatta

“प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडवर आणि कलाकारांच्या स्टारडमबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

“प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

शत्रुघ्न सिन्हा हे अशा बॉलीवूड अभिनेत्यांपैकी एक आहेत जे प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर आपले मत परखडपणे मांडतात. त्यासाठी अनेकदा त्यांना टिकेलाही समोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी एका प्रकरणात केआरके म्हणजेच कमाल आर खानचे समर्थन केले होते. तेव्हा त्यांच्यावर खूप टिका झाली. पण शत्रुघ्न सिन्हा यांनी कधीच टीकेची पर्वा केली नाही. आता पुन्हा एकदा एका मुद्द्यावर त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडवर आणि कलाकारांच्या स्टारडमबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : पाचव्यांदा बदलण्यात आली अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट, समोर आले कारण

शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकताच ‘ई टाईम्स’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सध्याची परिस्थिती आणि बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांची स्थिती यावर त्यांचे काय मत आहे, असं विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “करोना महामारीने चित्रपट व्यवसायचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्टारडम जवळजवळ संपत चाललं आहे. सेलिब्रिटीज आता ‘लार्जर दॅन लाइफ’ राहिलेले नाहीत. करोनाच्या संकटाने सर्वांना समान पातळीवर आणलं आहे. सध्या सुपरस्टार्सचं युग संपल्याचं दिसतं. निवडक चित्रपट आणि स्टार्सच यशस्वी होत आहेत.”

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “आता चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायचा की ओटीटीवर पाहायचा याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. याशिवाय कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहणंही महागडं झालं आहे. प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही. त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिमाही डागाळली आहे.”

हेही वाचा : “आर्यनला पाठिंबा दिला पण शाहरुखने मात्र…” अभिनेते शत्रुघ्न सिन्हा किंग खानवर नाराज

गेल्या काही महिन्यांत बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच अपयशी ठरले. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यात यशस्वी झाला आणि या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. याशिवाय ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’, ‘धोखा: राऊंड द कॉर्नर’ यांसारखे इतर चित्रपटांनाही प्रेक्षकांनी म्हणावा तितका प्रतिसाद दिला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली ‘मोठी’ घोषणा

संबंधित बातम्या

‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार राजूच्या भूमिकेत परतणार? चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर
आमिर खानच्या मुलीनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याला हृदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
बॉलिवूडची ‘दामिनी’ पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर; अभिनेत्रीने व्यक्त केली पुनरागमनाची इच्छा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…
तूपाचे सेवन ‘या’ ५ आजारांमध्ये ठरते विषासमान; तज्ज्ञांकडून जाणून घ्या तूप कोणी खावे आणि कोणी नाही
विश्लेषण : आपल्या देशात किती प्रकारच्या बँका आहेत? त्यांचे काम कसे चालते?
इमारतीच्या छतावर विटा नेण्यासाठी कामगारांनी शोधली भन्नाट आयडीया; नेटकरी म्हणाले, ‘क्रिएटीव्हीटीला सलाम’
“तुम्हाला परकं…” ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक