'बाळासाहेबांच्या मुलाने काय केलं…?' शरद पोंक्षेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात | cm eknath shinde dasara melawa sharad ponkshe speech criticize uddhav thackeray nrp 97 | Loksatta

‘बाळासाहेबांच्या मुलाने काय केलं…?’ शरद पोंक्षेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात अभिनेते शरद पोंक्षे, प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली.

‘बाळासाहेबांच्या मुलाने काय केलं…?’ शरद पोंक्षेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात अभिनेते शरद पोंक्षे, प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली.

सध्या राज्यात फक्त दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. तर दुसरीकडे हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले. विविध मुद्दयांवरुन केलेली खोचक टीका, टोलेबाजी यामुळे हे दोन्ही दसरा मेळावे फारच गाजले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शरद पोंक्षेंनी भाषण करतेवेळी रामायण आणि महाभारतात काही दाखलेही दिले. “रामायणात रावणाचा भाऊ बिभीषणाने भगवान श्री राम यांच्या बाजूने युद्ध लढले होते. श्रीरामाने बिभीषणाला आपल्या बाजूने लढायचे निमंत्रण दिले नव्हते. पण, बिभीषणाला माहित होते की, आपल्याला सत्याची, धर्माचीच साथ द्यावी लागणार आहे आणि रावण अधर्माच्या बाजूने आहे.
आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, भाजपाच्या राम कदमांचा इशारा

म्हणूनच, तो रावणाविरोधात आणि श्रीरामांच्या बरोबरीने लढला. पण, त्याचा कधीच कोणी गद्दार म्हणून उल्लेख केला नाही. महाभारतातही कर्णाला हरवणे अशक्य होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला निशस्त्र कर्णावर बाण मारण्यास सांगितले. पण, त्यालाही कोणी पाठीत खंजीर खुपसले असे म्हटले नाही.” असे शरद पोंक्षे म्हणाले.

“आज एकनाथ शिंदे हे श्रीकृष्णाची भूमिका बजावत आहेत. ज्या बाळासाहेबांनी म्हटले होते, माझा मुख्यमंत्री झाल्यावर मशिदीवरचे भोंगे खाली उतरवेन, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करेन, त्यांच्या मुलाने काय केले, सतत आमच्या देवांचा अपमान करणाऱ्या नेत्यांसोबत बसले. एकनाथ शिंदेंनी उचलले पाऊल किती योग्य होते, ते या मैदानावर आलेला जनसागर पाहून समजतं. सत्य आणि नितीमत्तेसाठी जे जे योग्य आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत”, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
आणखी वाचा : आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो, डोहाळे जेवणाचे फोटो समोर

दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अभिनेता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडेही उपस्थित होते. एकनाथ शिंदेंचे व्यासपीठावर आगमन होताच प्रसाद ओक आणि प्रवीण तरडेंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. यावेळी त्यांनी प्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंना समर्थन दिले. यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच याची सर्वत्र चर्चाही रंगली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मनोरंजनसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध कॉमेडीयन पराग कंसारा यांचं निधन

संबंधित बातम्या

‘अवतार २’ बघताना प्रेक्षकांनी टॉयलेटला कधी जावं? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचं भन्नाट उत्तर
२० वर्षांनंतर प्रशांत दामले घेऊन येत आहेत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
‘मला माझे काही जुने चित्रपट पाहिल्यावर राग येतो अन्..’,सुनील शेट्टीने केला खुलासा
The Kashmir Files संदर्भातील ‘त्या’ पोस्टमुळे स्वरा भास्करवर अनेकजण संतापले; म्हणाले, “तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला…”
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती