करोना परिस्थितीमुळे थिएटर बंद आहेत म्हणून अनेक निर्मात्यांनी त्यांचे चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोण रिस्क घेणार, असं म्हणत अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांची तारीख पुढे ढकलली. पण अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलून टाकलाय. होय, अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर बाजी मारलीय. या चित्रपटाने अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर नवा रेकॉर्ड रचलाय. ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ‘तूफान’च्या रिलीजनंतरच्या पहिल्या एक आठवड्यात सगळ्यात जास्त पाहिली गेलेली फिल्म ठरली आहे. विशेष म्हणजे 3,900 पेक्षा जास्त शहरांमधील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकतीच एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. २६ आणि २७ जुलै रोजी प्राइम डे च्या दिवशी या चित्रपटासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक लाभले आहेत. इतकंच नव्हे तर जगभरातील १६० हून अधिक देशांमध्ये आणि प्रांतातील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिलाय, असं स्ट्रीमरनी म्हटलंय. तसंच इतर भाषेतील ‘नारप्पा’ (तेलगू), ‘सरपट्टा परमबाराय’ (तामिळ) आणि ‘मलिक’ (मल्याळम) या चित्रपटांना सुद्धा भारतातील २,००,२०० हून अधिक शहरे आणि जगभरातील ११,५०० हून अधिक देशांमध्ये व प्रांतांमध्ये पाहिलं गेलं.

राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘तूफान’ चित्रपटात फरहान अख्तरसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर आणि परेश रावल सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. हा चित्रपट १६ जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला होता. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दमदार जोडीने ‘तुफान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा कमाल करून दाखवली आहे.

‘तुफान’ ही प्रेरणादायी कथा आहे. मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या ‘अज्जू’ या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून जाते. अनन्याचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. यातूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास सुरु होतो.

करोनाचं उद्भवलेलं संकट आणि लॉकडाउन यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या तारखा पुढे ढकलल्या. अशा सर्व चित्रपट निर्मात्यांपुढे ‘तूफान’ ने एक आदर्श निर्माण केलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farhan akhtar toofaan records best ever viewership on amazon prime video says streamer prp
First published on: 29-07-2021 at 22:40 IST