“वा दादा वा”च्या जागतिक हक्कांची मालकीण अन्…” प्राजक्ता माळीबाबत असं का म्हणाला समीर चौगुले?

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौगुलेने शेअर केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

“वा दादा वा”च्या जागतिक हक्कांची मालकीण अन्…” प्राजक्ता माळीबाबत असं का म्हणाला समीर चौगुले?
अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुलेने शेअर केलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांसाठी या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा १५ ऑगस्टपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक विनोदी कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कार्यक्रमाची सुत्रसंचालक म्हणजेच अभिनेत्री प्राजक्त माळीला तर प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. प्राजक्ताचा ८ ऑगस्टला वाढदिवस होता. याचनिमित्त अभिनेता समीर चौगुलेने तिला हटके अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड” प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंकडून हळहळ व्यक्त

समीर चौघुलेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. समीरसह या कार्यक्रमाची संपूर्ण टीम एका कुटुंबासारखीच आहे. प्राजक्ताला कलाविश्वातील अनेक मंडळींनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. समीरने प्राजक्तासाठी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर देखील चर्चेचा विषय ठरली.

समीरने प्राजक्ताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटलं की, “माझ्या खऱ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझ्या “वा दादा वा”च्या जागतिक हक्कांची मालकीण, अत्यंत लाघवी आणि स्फुर्तीने काम करणारी मुलगी. दीड-दीड पानांचं स्क्रिप्ट अक्षरशः १५ मिनिटांत पाठ करून अत्यंत सहज सुलभ पद्धतीने सादर करणे ही तिला मिळालेली दैवी देणगी आहे. तू माझ्यासाठी अगदी खास आहेस हे तुला देखील माहित आहे.”

आणखी वाचा – Photos : दर महिन्याला मेकअपसाठी किती खर्च करता? अमृता फडणवीस म्हणाल्या…

समीरने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून समीर-प्राजक्ताच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अनेकांनी प्राजक्ताला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत तिच्याबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fem prajakta mali birthday sameer choughule share special post on instagram kmd

Next Story
“आम्ही लवकरच…” सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी