‘मेजर’ चित्रपट पाहताना ‘या’ कारणामुळे अचानक रडू लागली महिला, व्हिडीओ शेअर करत सई म्हणाली…

सईने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

major, adivi sesh, saiee manjrekar, viral video,
सईने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकही या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. याच चित्रपटाच्या शोदरम्यानचा थिएटरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता. हा व्हायरल व्हिडीओ आता अभिनेत्री सई मांजरेकरने शेअर केला आहे.

आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत एका लष्करी अधिकाऱ्याची पत्नी तिच्या पतीबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल बोलताना भारावून गेल्याचे दिसते. चित्रपट पाहिल्यानंतर भावूक झालेल्या महिलेच्या आणि सैन्यदलात काम करणाऱ्या तिच्या पतीला चित्रपटगृहात असलेल्या प्रेक्षकांकडून दाद मिळाली. “हे माझे पती मेजर अभिषेक आहेत आणि तेसुद्धा तसंच काम करत आहेत. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो”, असं पूजा या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. त्यानंतर तिचा पती उठतो आणि तिला मिठी मारतो. हे पाहून थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनीही त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात.

आणखी वाचा : “तू देशाचा पंतप्रधान आहेस का?”, मुस्लिमांची बाजू घेतल्यामुळे विशाल दादलानी झाला ट्रोल

आणखी वाचा : मुलीने अग्निपथ योजनेत सामील होण्याची व्यक्त केली इच्छा, रवी किशनने दिले असे उत्तर

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत सई म्हणाली, दिल्लीतील पूजा यादव सैन्यात सेवा करणाऱ्या आपल्या पतीबद्दल बोलते. सैनिकांच्या कुटुंबांचे बलिदान ओळखण्यासाठी #Major लोकांना मदत करत आहे, याबद्दल खरोखर कृतज्ञ आहोत, असे कॅप्शन सईने दिले आहे.

आणखी वाचा : तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

आदिवी शेषने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हाच व्हिडीओ शेअर केला होता. ‘ही क्लिप मला काल रात्री व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आली होती. मेजर तिसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे आणि लोकांना प्रेरणा देत आहे, असे कॅप्शन आदिवीने दिले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Major adivi sesh saiee manjrekar shares a viral video of a woman in tears as she lauds soldies dcp

Next Story
आईच्या निधनानंतर पिंकी रोशन यांची भावुक पोस्ट, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली
फोटो गॅलरी