Amruta Khanvilkar New Home : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ऐन दिवाळीत अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या या नव्या घराला खास नाव देखील दिलं आहे.
अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) नव्या घराबद्दल म्हणाली, “स्वप्नांच्या या शहरात घर विकत घेणं हे खरंच एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. आज माझ्या वाढदिवसाच्या महिन्याच्या सुरुवातीला आणि लक्ष्मी पूजेच्या या शुभवेळेत मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लक्ष्मीचं स्वागत करतेय. या प्रवासात माझी गृहलक्ष्मी, माझी आई माझ्याबरोबर आहे.”
हेही वाचा : Video : तितीक्षा तावडेचं सासरचं घर पाहिलंत का? दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट
नव्या घराला अमृता खानविलकरने दिलं खास नाव
“आयुष्यात नेहमीच मला एक असं स्वतःचं घर हवं होतं, जे माझ्या मेहनतीने आणि प्रेमाने तयार झालेलं असावं. माझ्या कुटुंबासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी याशिवाय निर्वाण आणि नूर्वीसाठी मला एक असं घर हवं होतं… अशा घरात जिथं आम्ही सगळे एकत्र येऊ शकतो, अनेक खास क्षण साजरे करू शकतो, आणि जीवनातील सुंदर क्षण अनुभवू शकतो. मुंबईत घर घेणं हे खूपच स्वप्नवत वाटतंय. २२ व्या मजल्यावर असलेलं हे माझं छोटंसं ३ बीएचके विश्व, मी त्याला ‘एकम’ असं नाव दिलं आहे.” असं अमृताने सांगितलं.
अमृता खानविलकरच्या ( Amruta Khanvilkar ) नव्या घरात सध्या इंटिरियरचं काम सुरू आहे. लवकरच अभिनेत्री या घराची संपूर्ण झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अमृतावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, अभिनेत्रीच्या ( Amruta Khanvilkar ) कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमृता नुकतीच ‘लाईक आणि सबस्क्राईब’ झळकली होती. यामध्ये तिच्याबरोबर अमेय वाघ, शुभंकर तावडे, राजसी भावे हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.