काही दिवसांपूर्वी १००वं नाट्यसंमेलन पार पडलं. या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकलाकारांना टोपणनावाऐवजी आदराने हाक मारली पाहिजे असा सल्ला दिला होता. पण काल, २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘तिकीटालय’ अ‍ॅप लाँचच्या कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सवयीप्रमाणे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबद्दल बोलताना ‘चंकू सर’ असं म्हणाला. यावरून राज ठाकरे यांनी भर कार्यक्रमात संकर्षणला चूक दाखवत त्याला मार्मिक शब्दांत सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- सिद्धू मुसेवालाचा जिवलग मित्र बंटी बेंसवर जीवघेणा हल्ला, रेस्टॉरंटमध्ये केला गोळीबार

‘तिकीटालय’ या अ‍ॅप लाँचच्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, “सर्व प्रथम तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. ज्यांच्याकडे आ वासून लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, महेश कोठारे सर, प्रशांत दामले सर आणि नाट्यसृष्टीतील माझ्या बंधू,भगिनींनो…संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे. तर ‘चंकू सर’ असं काही नसतं. मी चंद्रकांत कुलकर्णी सर समजू शकतो. त्याच्यामुळे पुढे आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे.”

हेही वाचा – Video: पूजा सावंतने प्रीती झिंटाच्या गाण्यावर हळदीत केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

“त्यादिवशी माझ्याकडे श्रीरंग गोडबोले आले होते. त्यांनी मला सांगितलं की, परवा दिवशी आम्ही कॅफे गूड लकमध्ये गेलो होतो आणि तिथे मी सांगितलं की, दोन ‘आनंदरावांची ओमेल्ट’ द्या म्हणून. कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर…” राज ठाकरेंनी सांगितलेल्या या किस्सानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray target to sankarshan karhade over calling nickname pps
First published on: 28-02-2024 at 10:22 IST