फक्त जेवायला मिळेल म्हणून मी पार्ट्यांमध्ये डान्स करायचो; मिथुन चक्रवर्तींचा खुलासा

मिथुन यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवडचा डिस्को डान्सर अशी ओळख असलेले अभिनेते म्हणजे मिथुन चक्रवर्ती. त्यांनी आजवर जवळपास ३५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. उत्तम अभिनयासोबत त्यांच्या डान्सिंग स्टाइलचे अनेक चाहते होते. पण त्यांचा इथपर्यंतचा प्रवास फार कठीण होता. नुकताच त्यांनी एका शोमध्ये जेवण मिळवण्यासाठी अनेक पार्ट्यांमध्ये डान्स करायचो असे सांगितले आहे.

मिथुनदा हे ‘हुनरबाझ देश की शान’ या छोट्या पडद्यावरील शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होते. दरम्यान शोमधील स्पर्धक आकाश सिंहचा संघर्ष ऐकून मिथुन हे भावूक झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघर्ष करावा लागला होता असे सांगितले आहे. जेवण मिळेल म्हणून मिथुन दा हे पार्ट्यांमध्ये डान्स करायचे.
आणखी वाचा : अभिनेत्याने सोनाक्षीसोबतच्या अफेअरवर दिले स्पष्टीकरण, म्हणाला…

सुरुवातीला मिथुन यांच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. ‘मला असे वाटले होते की कुणी मला हिरो म्हणून चित्रपटामध्ये कुणीही घेणार नाही. त्यामुळे मी खलनायकाच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. मी नोकरी देखील करत होतो. जेणेकरुन माझ्याकडे थोडेफार पैसे जमा होतील. जेवायला मिळेल म्हणून मी अनेक मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करायचो’ असे बोलत मिथुन दा भावून झाले.

या शोमध्ये काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा परिक्षक म्हणून दिसत आहे. तिने एका मुलाखतीमध्ये रिअॅलिटीशो विषयी वक्तव्य केले आहे. ‘मी माझ्या एकंदरीत अनुभवावरुन सांगत आहे. आम्हाला कधीही स्क्रीप्ट दिली जात नाही किंवा काय बोलायचे हे सांगितले जात नाही. आम्ही कधीही शोपूर्वी स्पर्धकांना भेटत नाही. स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहून आमची जी प्रतिक्रिया असते ती त्यावेळी समोर दिसणाऱ्या परफॉर्मन्सवर असते. जर एखाद्या स्पर्धकाला त्याची कथा सांगायची असेल तर ती त्याने का सांगू नये? त्यांचे टॅलेंट फेक नसते आणि त्यांना परफॉर्म करण्यासाठी एक संधी दिली जाते. जे काही रिअॅलिटी शोमध्ये दाखवले जाते ते खरे असते’ असे परिणीती म्हणाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mithun chakraborty recalls the time when he danced at big parties to get food to eat avb

Next Story
समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्रीने केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी