"मी आज जे काही कमावलं..." ‘मैने पायल है छनकाई'च्या रिमेक वर्जनवरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा कक्करचं सडेतोड उत्तर | neha kakkar share post and reply to trollers about falguni pathak maine payal hai chhankai song recreat version see details | Loksatta

“मी आज जे काही कमावलं…” ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेक वर्जनवरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा कक्करचं सडेतोड उत्तर

नेहा कक्करने आपल्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

“मी आज जे काही कमावलं…” ‘मैने पायल है छनकाई’च्या रिमेक वर्जनवरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा कक्करचं सडेतोड उत्तर
नेहा कक्करने आपल्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

गायिका फाल्गुनी पाठक यांच्या सुपरहिट गाण्यांचे लाखो चाहते आहेत. आजही तरुणाई फाल्गुनी यांच्या गाण्यावर ठेका धरताना दिसते. त्यांची ‘इंधना विनवा’, ‘सावन मे मोरणी बनके’ सारखी गाणी प्रचंड हिट ठरली. पण त्यांच्या एखाद्या गाण्याचं रिमेक वर्जन तुम्हाला ऐकायला आवडेल का? तर फाल्गुनी यांच्या अनेक चाहत्यांचं यावर बहुदा नाही असंच उत्तर असावं. म्हणूनच की काय गायिका नेहा कक्करने फाल्गुनी यांच्या एका गाण्याचं रिमेक वर्जन गायलं आणि नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा गरोदर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

फाल्गुनी यांचं ‘मैने पायल है छनकाई अब तो आजा तू हरजाई’ गाण्याचं रिमेक वर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करने या गाण्याचं रिमेक वर्जन स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड केलं आहे. पण फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. तसेच नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आपण ट्रोल होत आहे हे पाहता नेहाने आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

काय म्हणाली नेहा कक्कर?
“इतक्या लहान वयामध्ये मी आज जे काही कमावलं आहे ते फार कमी लोकांच्या नशिबामध्ये असतं. सुपरहिट गाणी, फेम, सुपरहिट टीव्ही शोज्, वर्ल्ड टूर, लहानांपासून ते ८०-९० वयोगटापर्यंतचे फॅन्स अजून काय पाहिजे… तुम्हाला माहीत आहे का आवड, मेहनत आणि सकारात्मकतेच्या जोरावर मी हे सगळं मिळवलं आहे. आज माझ्याजवळ जे काही आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते. मी या जगामधील भाग्यवान व्यक्ती आहे. तुम्हा सर्वांना आनंदा आयुष्यासाठी शुभेच्छा.” असं नेहा कक्करने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

नेहाने आपल्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘मैने पायल है छनकाई अब तो आजा तू हरजाई’ गाण्याचं रिमेक वर्जन असणारं ‘ओ सजना’ हे गाणं १९ सप्टेंबरला प्रदर्शित झालं. पण बहुदा फाल्गुनी पाठक यांनादेखील तिचं हे गाणं आवडलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“विचार करून बोलण्याची सवय लागली तर…” बॉयकॉट ट्रेंडवर गोविंदा यांची स्पष्ट प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं
‘कधी तिच्यासोबत मंदिरातही जा..’ अजमेर शरीफला गेल्यानं शोएब- दीपिका ट्रोल
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द