२०२२ हे वर्ष खऱ्या अर्थाने दाक्षिणात्य चित्रपटांसाठी भाग्यवानच म्हणायला हवे. एकामागोमाग एक चित्रपट हिट होताना दिसून येत आहेत. तर बॉलिवूडमध्ये बड्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमिर आणि अक्षयच्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसून येत आहेत. ११ ऑगस्ट रोजी बॉलिवूडच्या दोन मोठ्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन, पण दोन्ही चित्रपटांना अपेक्षेपेक्षा जास्त यश त्यांना जास्त मिळाले नाही. मात्र कमी बजेटअसलेला सीता रामम हा दाक्षिणात्य चित्रपट उत्तमरित्या चालतो आहे. आता ज्या चित्रपटाची एवढी चर्चा होत आहे त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे, तर सीता रामबद्दल जाणून घेऊयात..

“आमिर खानची काय चूक…” ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षकांच्या थंड प्रतिसादावर मोना सिंगची नाराजी

सीता रामम हा तेलगू काळातील रोमँटिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन हनु राघवपुडी यांनी केले आहे. चित्रपटात दुल्कर सलमान, मृणाल ठाकूर, रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे मृणाल ठाकूरने तेलुगुमध्ये पदार्पण केले आहे. सीता रामम मध्ये १९६४ चा काळ दाखवण्यात आला आहे. चित्रपटाची कथा आहे ती लेफ्टनंट रामची. जो लष्करी अधिकारी असून काश्मीर सीमेवर तैनात आहे. त्याला सीता महालक्ष्मीचे निनावी प्रेमपत्र मिळाल. यानंतर राम सीतेला शोधण्याच्या मोहिमेवर निघतो. तो सीतेचा शोध घेतो आणि तिला प्रपोज करू इच्छितो.

चित्रपटाने कमावले ५० कोटी?

या चित्रपटात मृणालने सीतेची, दुलकर सलमानने राम आणि आफरीनची भूमिका रश्मिका मंदानाने साकारली आहे. चित्रपटाचे बजेट ३० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.सीता राममने पहिल्या दिवशी जगभरात ५.२५ कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाने जगभरातील मार्केटमध्ये ५० कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New south indian film sita ramam breaking records on box office spg
First published on: 15-08-2022 at 18:09 IST