कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडला. ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे कोट्यावधी भारतीयांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत भारतातून एका माहितीपटाला नामांकन मिळाले होते. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कारमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. ‘रायटिंग विथ फायर’ हा रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित माहितीपट आहे. यापूर्वी या माहितीपटाला सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि प्रेक्षक पसंतीचा असे दोन पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे अनेक भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘डय़ून’ चित्रपटाला ६ ऑस्कर, कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मात्र भंगले

मात्र सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कारावर द समर ऑफ सोलने नाव कोरले. त्यामुळे ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला अपयश आले. ‘रायटिंग विथ फायर’सोबतच ‘असेंशन’, ‘एटिका’, ‘फ्ली’ या माहितीपटांनाही नामांकन मिळालं होते.

कोणत्या विषयावर आधारित आहे ‘रायटिंग विथ फायर’

दरम्यान ‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘खबर लहरिया’ वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. या वृत्तपत्राची सुरुवात २००२ मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओनं बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. ‘रायटिंग विथ फायर’मध्ये ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्मपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या माहितीपटात मीरा आणि तिच्या सहकाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पुरुषप्रधान संस्कृती विरोधात आवाज उठवतात, पोलीस दलाची अक्षमता तपासतात आणि जात, लैंगिक अत्याचार पीडितांबाबत लिहितात.

Oscars 2022 : ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत, ‘या’ चित्रपटाला मिळाले नामांकन

या अगोदर ‘रायटिंग विथ फायर’चं २०२१मध्ये सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. या फेस्टिव्हलमध्ये या माहितीपटानं ‘द ऑडियन्स अवॉर्ड’ आणि ‘स्पेशल ज्यूरी अवॉर्ड’ जिंकले होते. आतापर्यंत या माहितीपटानं २० पेक्षा जास्त आंतराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscars awards 2022 indian documentary writing with fire is out of the oscar race summer of soul emerges winner nrp