scorecardresearch

Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ‘डय़ून’ चित्रपटाला ६ ऑस्कर, कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न मात्र भंगले

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला.

Oscars 2022 Updates, 94th Academy Awards: सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा धामधुमीत पार पडला. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाने सर्वाधिक ६ पुरस्कारावर नाव कोरले. ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.

त्यासोबत किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर ‘The Eyes of Tammy Faye’ या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘कोडा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी ‘कोडा’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.

दरम्यान वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटानं सहा पुरस्कार जिंकले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग’, ‘सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर’, ‘सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन’, ‘सर्वोत्कृष्ट साउंड’, ‘सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट’, ‘सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी’ असे एकूण सहा पुरस्कार जिंकले आहेत. तर ट्रॉय कोत्सुर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर असून पुरस्कार स्विकारतेवेळी ते भावूक झाले.

Live Updates

Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.

09:41 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट चित्रपट : कोडा

'कोडा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळाला आहे. यावेळी कोडा चित्रपटाच्या संपूर्ण टीममधील कलाकारांना ऑस्करमध्ये स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले.

https://twitter.com/ANI/status/1508293121217490945

09:27 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसिका चेस्टेन

'The Eyes of Tammy Faye' या चित्रपटासाठी जेसिका चेस्टेन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

08:51 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट अभिनेता : विल स्मिथ

किंग रिचर्ड या चित्रपटासाठी अभिनेता विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना स्मिथ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

https://twitter.com/TheAcademy/status/1508280343203176452

08:36 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : जेन कॅम्पियन

जेन कॅम्पियन यांना 'द पॉवर ऑफ द डॉग' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला आहे. या श्रेणीत पॉल थॉमस अँडरसन, केनेथ ब्रानाघ, स्टीव्हन स्पीलबर्ग, रुसुके हामागुची यांनाही नामांकन मिळाले होते.

https://twitter.com/TheAcademy/status/1508277765006520322

08:34 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट मूळ गायक : बिली एलिश

जेम्स बाँडच्या 'नो टाइम टू डाय' या गाण्यासाठी बिली एलिशला सर्वोत्कृष्ट मूळ गायकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. बिलीचा हा पहिलाच अकादमी पुरस्कार आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1508276649468473350

08:22 (IST) 28 Mar 2022
प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती : आर्मी ऑफ द डेड

प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेला चित्रपट म्हणून जॅक स्नायडरच्या 'आर्मी ऑफ द डेड' ची निवड ऑस्कर पुरस्कारासाठी करण्यात आली.

https://twitter.com/Variety/status/1508266767197614081

08:08 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट माहितीपट : द समर ऑफ सोल

सर्वोत्कृष्ट माहितीपट या श्रेणीत द समर ऑफ सोलने ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरले. या श्रेणीत ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले होते. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.

https://twitter.com/TheAcademy/status/1508270082950008835

07:55 (IST) 28 Mar 2022
बेस्ट ओरिजनल स्कोर : ड्यून

बेस्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार हंस झिमर यांना मिळाला आहे. ड्यून या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला.

https://twitter.com/TheAcademy/status/1508265748099059713

07:43 (IST) 28 Mar 2022
बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्ले : शॉन हेडर

बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार शॉन हेडर यांना मिळाला आहे. त्यांना कोडा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. यावेळी ते फार भावूक झाले

https://twitter.com/TheAcademy/status/1508263602796388352

07:39 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : द लाँग गुडबाय

'द लाँग गुडबाय' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. अनिल कारिया यांच्यासह या चित्रपटाचे लेखन रिझ यांनी केले आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1508263000691527683

07:36 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : बेलफास्ट

केनेथ ब्रानाघ (Kenneth Branagh) निर्मित बेलफास्ट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/TheAcademy/status/1508262748932624385

07:28 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : जेनी बेवन

सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार या श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार क्रुएला चित्रपटासाठी जेनी बेवन यांना मिळाला.

https://twitter.com/TheAcademy/status/1508258877707411461

07:23 (IST) 28 Mar 2022
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पाळण्यात आले मौन

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांसाठी ऑस्कर सोहळ्यात मौन पाळण्यात आले.

07:13 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ड्राइव्ह माय कार

'ड्राइव्ह माय कार'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ड्राईव्ह माय कार, फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनाना: अ याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड यांना देखील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले होते.

https://twitter.com/TheAcademy/status/1508255642917617664

06:57 (IST) 28 Mar 2022
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : ट्रॉय कोत्सुर

ट्रॉय कोत्सुर (Troy Kotsur) यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ५३ वर्षीय ट्रॉय यांचा हा पहिला ऑस्कर आहे. हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले.

https://twitter.com/TheAcademy/status/1508252845073600516

06:54 (IST) 28 Mar 2022
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या आठवणींना उजाळा

यंदाच्या वर्षी जेम्स बाँडला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या खास प्रसंगी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जेम्स बाँडच्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

06:38 (IST) 28 Mar 2022
वॉर्नर ब्रदर्स निर्मित ‘डय़ून’ चित्रपटाला आतापर्यंत ६ ऑस्कर पुरस्कार

‘डय़ून’ या चित्रपटाला आतापर्यंत सहा ऑस्कर मिळाले आहेत

 • सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग
 • सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोर
 • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइन
 • सर्वोत्कृष्ट साउंड
 • सर्वोत्कृष्ट विजुअल इफेक्ट
 • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
 • 06:30 (IST) 28 Mar 2022
  बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट: ड्यून

  ड्युन या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार जिंकला. आतापर्यंत या चित्रपटाला ६ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508244382754869250

  06:19 (IST) 28 Mar 2022
  बेस्ट सिनेमॅटोग्राफी : ‘ड्यून’

  ग्रेग फ्रेझर यांना ‘ड्यून’ या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर मिळाला आहे.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508242088231686150

  06:06 (IST) 28 Mar 2022
  सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री अॅरियाना डीबोस

  अभिनेत्री अॅरियाना डीबोसला यंदाचा ९४ व्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'वेस्ट साइड स्टोरी' चित्रपटातील अभिनयासाठीत तिला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात तिने अनिता नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508238245259145223

  06:01 (IST) 28 Mar 2022
  सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल: द आय ऑफ टॅमी फेय

  सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलसाठी देण्यात येणारा ऑस्कर 'द आय ऑफ टॅमी फेय'ला मिळाला आहे.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508226550814044160

  05:59 (IST) 28 Mar 2022
  बेस्ट प्रोडक्शन डिझाइन: ड्यून

  ड्यून या चित्रपटाला बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508226268906414082

  05:56 (IST) 28 Mar 2022
  बेस्ट फिल्म् एडिटिंग : ड्यून

  वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ चित्रपटाला आतापर्यंत तिसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट फिल्म् एडिटिंगचा ऑस्कर पुरस्कार ड्यूनने पटकावला आहे.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508268187795697668

  https://twitter.com/TheAcademy/status/1508224729202630659

  05:49 (IST) 28 Mar 2022
  सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म

  रॉबर्ट अल्टमॅन यांची निर्मिती असलेल्या 'दी लाँग गुडबॉय' ला सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे.

  https://twitter.com/TheAcademy/status/1508223541660950530

  05:46 (IST) 28 Mar 2022
  सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

  'द विंडशिल्ड वायपर' ने बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 

  https://twitter.com/TheAcademy/status/1508223481715978241

  05:44 (IST) 28 Mar 2022
  ‘दी क्वीन ऑफ बास्केटबॉल’ बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्टचा ऑस्कर पुरस्कार जाहीर

  बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट प्रकारात 'दी क्वीन ऑफ बास्केटबॉल' ला ऑस्कर पुरस्कार जाहीर

  https://twitter.com/TheAcademy/status/1508243860907982849

  https://twitter.com/TheAcademy/status/1508223352732676099

  05:21 (IST) 28 Mar 2022
  Oscars 2022 : ‘अँड दी ऑस्कर गोज टू…’; ऑस्कर पुरस्कारासाठी विजेत्यांची निवड कशी केली जाते?

  https://twitter.com/LoksattaLive/status/1507651125969039361

  05:19 (IST) 28 Mar 2022
  ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत, ‘या’ चित्रपटाला मिळाले नामांकन

  ९४ व्या अकादमी पुरस्कारासाठी भारतही शर्यतीत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील एका माहितीपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे.

  https://twitter.com/LoksattaLive/status/1507635180269637635

  05:17 (IST) 28 Mar 2022
  ‘अकादमी पुरस्कार’ अशीही खास ओळख
 • ऑस्कर पुरस्कारला ‘अकादमी पुरस्कार’ या नावानेही ओळखले जाते.
 • चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
 • अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ या संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो.
 • १९२७ मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीचे उद्दिष्ट हे मोशन पिक्चर्सच्या कला आणि विज्ञानांची प्रगती करणे असा आहे.
 • 05:15 (IST) 28 Mar 2022
  ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची खास वैशिष्ट्ये
 • कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार
 • चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान
 • सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरव
 • Oscars Awards 2022 : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. ९४ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकने मिळाली होती. तर ऑस्कर पुरस्कार नामांकनांमध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाचा समावेश आहे.

  Web Title: Oscars 2022 live oscars 2022 full list of winners live 94th academy awards live updates in india nrp

  ताज्या बातम्या