संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ या वेब सीरिजने सध्या सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलंय. या सीरिजमधील सेट, गाणी, कपडे आणि दागिने यांच्या भव्यतेने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातलीय. हीरामंडीची स्टारकास्टदेखील तितकीच खास आहे. वेब सीरिजमधील अभिनेत्रींचं खूप कौतुक झालं, पण शर्मिन सेगलला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.

अभिनेत्री शर्मिन सेगलने हीरामंडीमध्ये आलमजेबची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयामुळे तिला खूप ट्रोल केलं गेलं. सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची खिल्ली उडवण्यात आली, तसेच अनेक मीम्सदेखील तिच्यावर बनवले गेले. तर तिच्या मुलाखतींमध्ये ती सह-कलाकारांशी ‘असभ्य’ वागते आणि ‘अनादर’ दाखवते असं बोलूनही तिला ट्रोल केलं गेलं. आता याबद्दल शर्मिनने मौन सोडलं आहे.

हेही वाचा… राहाच्या फॅशनची जबाबदारी रणबीर कपूरकडे, आलिया किस्सा सांगत म्हणाली, “मला नेहमीच असं वाटायचं…”

शर्मिन म्हणाली, “माझ्या सहकलाकारांनी मला खूप सपोर्ट केलाय. काही जणांनी तर माझी वैयक्तिकरित्या चौकशी केली आणि पब्लिक प्लॅटफॉर्म्सवर माझ्या बाजूने ते उभे राहिले. मला तर असं वाटतं की, त्यांना जाऊन एक मिठी मारावी. अदितीला माझी काळजी आहे आणि मलादेखील. सगळ्यांमध्ये तीच एक अशी आहे, जिने या महिन्यात मला अनेकदा कॉल केला आणि माझी विचारपूस केली. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. जे लोकांना आता माझ्याबद्दल वाटतंय ते खूप चुकीचं आहे, मला तिच्याबद्दल आदर आहे.”

हेही वाचा… ‘पुष्पा-२’ चित्रपटाची तारीख बदलली, संतप्त चाहत्याने थेट निर्मात्यांना दिली ‘ही’ धमकी

शर्मिन पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की, नकळत मला वाईट, असभ्य किंवा अनादर करणारी व्यक्ती ठरवणं अयोग्य आहे आणि त्यामुळे मला त्रास होतो. माझ्यासाठी कमेंट सेक्शनमधले लोकं एखाद्या व्यक्तीला चांगलं किंवा वाईट ठरवू शकत नाही, कारण ते लोक मला ओळखत नाहीत.”

हेही वाचा… आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा नव्हे तर ‘ही’ ठरली २०२४ मधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, पाहा यादी

दरम्यान, ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही वेब सीरिज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये शर्मिनसह, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, संजिदा शेख, फरदीन खान, ताहा शाह आदी कलाकार आहेत.