दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अभिनेता राम चरणच्या नवीन चित्रपट ‘गेम चेंजर’वर जोरदार टीका केली आहे आणि या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर दाखवल्या जाणाऱ्या आकड्यांवर शंका उपस्थित केल्या आहेत. निर्मात्यांनी दावा केलेल्या आणि विविध ट्रेडने अहवाल दिलेल्या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठा फरक असल्याचे दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी संध्याकाळी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर राम गोपाल वर्मा यांनी उपरोधाने लिहिले, “एस एस राजमौली आणि सुकुमार यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला रिअल टाइम कलेक्शनमधून प्रचंड उंचीवर नेलं आहे, ज्यामुळे बॉलीवूड हादरून गेलं. मात्र, ‘गेम चेंजर’ सिनेमाच्या लोकांनी हे सिद्ध केलं आहे की दाक्षिणात्य सिनेसृष्टी फसवणुकीत महान आहे.”

हेही वाचा…दाक्षिणात्य सुपरस्टारचा मोठा निर्णय! सिनेविश्वात २० वर्षे ज्या नावाने ओळख मिळाली, तेच बदलणार…; स्वतः घोषणा करत म्हणाला…

वर्मा यांनी या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले आणि लिहिले, “मला खरोखरच माहित नाही की या अत्यंत लज्जास्पद आणि मानहानीकारक फसवणुकीच्या मागे कोण आहे, ज्यामुळे ‘बाहुबली’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ २’, ‘कांतारा’ यांसारख्या दक्षिणेकडील सिनेमांच्या उत्कृष्ट कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

राम गोपाल वर्मा यांनी ‘गेम चेंजर’चे निर्माते दिल राजू यांना निर्दोष ठरवत लिहिले, “मला माहित नाही की या अविश्वसनीय आणि मूर्खपणाच्या खोट्या आकड्यांमागे कोण आहे, पण निश्चितपणे ते दिल राजू असू शकत नाहीत. कारण ते अतिशय नम्र आणि वास्तवात राहणारे आहेत आणि अशा प्रकारच्या फसवणुकीत ते सामील होऊ शकत नाहीत.”

हेही वाचा…“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

‘गेम चेंजर’च्या बॉक्स ऑफिस आकड्यांमधील विसंगती

‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांनी चित्रपटाने पहिल्या दिवशी १८६ कोटी कमावल्याचा दावा केला, हा सिनेमा १० जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. हा आकडा चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला. मात्र, ट्रेड अहवालानुसार चित्रपटाने जगभरात १०० कोटींच्या आतच कमाई केली आहे, तर काही अहवालांनुसार (उदा. सॅकनिल्क) या चित्रपटाने केवळ ८० कोटी कमावले आहेत.

हेही वाचा…श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

फसव्या आकड्यांवर राम गोपाल वर्मा यांची टीका

‘गेम चेंजर’च्या वाढवून सांगितलेल्या आकड्यांवर भाष्य करताना, वर्मा यांनी चित्रपटाच्या बजेटवरही शंका घेतली. एका वेगळ्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “जर ‘गेम चेंजर’ चा खर्च ४५० कोटी असेल, तर ‘आरआरआर’च्या अप्रतिम दृश्यात्मक प्रभावासाठी ४५०० कोटी लागले असते. आणि जर ‘गेम चेंजर’ने पहिल्या दिवशी १८६ कोटी कमावले असतील, तर ‘पुष्पा २’ने १८६० कोटी कमवायला पाहिजेत. सत्य ही अशी गोष्ट आहे जी विश्वासार्ह वाटली पाहिजे.”

हेही वाचा…बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

शंकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गेम चेंजर’ हा एक राजकीय थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात राम चरण, कियारा अडवाणी आणि एस.जे. सूर्या मुख्य भूमिका साकारत आहेत. चित्रपटाने स्थानिक बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली, मात्र सोमवारी नंतर त्याची कमाई घटली. चार दिवसांनंतरही चित्रपटाने देशांतर्गत १०० कोटींचा नेट कलेक्शनचा आकडा गाठलेला नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma calls game changer box office collection numbers fraud ram charan movie psg