छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विकेंड का वारमध्ये या वेळी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया आणि मिथुन चक्रवर्ती यांनी हजेरी लावली होती. भारती आणि हर्ष दोघेही ‘हुनरबाझ’ या त्यांच्या शोच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी बोलताना सलमानला त्या दोघांची इर्ष्या होते, असं त्याने म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी भारती म्हणाली, ती पहिल्यांदाच एखाद्या सुपरस्टारला तिची आणि हर्षची ‘इर्ष्या’ करताना पाहत होती. भारती सलमानला चिडवत म्हणाली, “सर, तुमच्या आणि आमच्या चेकमध्ये किती फरक आहे. आमच्या चेकवर फक्त ५ शून्य असतात आणि तुमच्या चेकवर १५ पेक्षा जास्त.” तर पुढे हर्ष बोलतो, “सर, चेकच्या बाहेर शून्य जातात.” यावर सलमान हसू लागतो.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

पुढे भारती सलमानला ‘सुपरहिट होस्ट’ बोलते आणि आता त्याची रिअॅलिटी शोचे ‘जज’ होण्याची वेळ आल्याचे बोलते. यावर सलमान हसत बोलतो, “आज पर्यंत कधीच ‘जज’ नाही झालो, पण ‘जज’समोर बऱ्याचवेळा उभा राहिलो आहे.” यावेळी सलमान जुन्या खटल्यांवर बोलत असतो.

आणखी वाचा : अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची बातमी ऐकून सुनील शेट्टी संतप्त, म्हणाले…

दरम्यान, काळवीट शिकार प्रकरणी सलमानला यापूर्वी तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने २००२ साली झालेल्या हिट-अँड-रन खटल्यातील सर्व आरोपांतून सलमानची मुक्तता केली होती. यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान त्याच्या शेजाऱ्यावर केलेल्या मानहानीच्या दाव्यामुळे चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan takes dig at his court cases on being told to become reality show judge dcp