scorecardresearch

“…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

नीना गुप्ता यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

neena gupta, kapil sharma,
नीना गुप्ता यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच, नीना यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

नीना यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिल नीना यांना बोलतो की आम्ही असं ऐकलं होतं की “तुम्हाला ‘बेवॉच’ चित्रपटात पामेला एंडरसनची भूमिका साकारायची होती.” यावर त्या कपिलला उत्तर देत म्हणाल्या, “अरे माझे इतके मोठे बूब्स नाही मग कसं करणार.” नीना यांनी दिलेलं उत्तर ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात. त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तिरेखा; श्रेयस तळपदेन केला खुलासा

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र? अभिनेत्रीने केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा

दरम्यान, नीना या सगळ्यात शेवटी ‘८३’ या चित्रपटात दिसल्या. या आधी त्या सरदार का ‘ग्रॅंड सन’, ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये ही काम केले आहे. तर लवकरच नीना या अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गूडबाय’ या चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neena gupta wanted to play pamela anderson in hollywood film baywatch dcp

ताज्या बातम्या