जन्माष्टमीचा सण आला की आपसुक टीव्ही मालिकेतील श्रीकृष्णाची आठवण काढली जाते. श्रीकृष्ण म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अभिनेता स्वप्नील जोशीने साकारलेला श्रीकृष्ण. स्वप्नील जोशीने साकारलेल्या या भूमिकेला इतकी लोकप्रियता मिळत गेली नंतर लोक अक्षरशः स्वप्नील जोशीलाच श्रीकृष्ण समजू लागले. इतके वर्ष उलटूनही लोक आजही या गोंडस श्रीकृष्णाची आठवण काढत असतात. अभिनेता स्वप्नील जोशीने सुद्धा त्याच्या स्पेशल आठवणी शेअर करत चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या जन्माष्टमीच्या निमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक जुना फोटो शेअर केलाय. त्याने साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेचा हा जुना फोटो त्याने शेअर केलाय. या फोटोंमध्ये तो बाल कृष्णाच्या भूमिकेत दिसतोय. हा फोटो शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘राधे राधे’ असं लिहित त्याने हा थ्रो बॅक फोटो शेअर केलाय. तसंच त्याने चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.


अभिनेता स्वप्नील जोशीहा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यावेळी स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती, त्यावेळी त्याचं वय अवघं १३ वर्ष इतकंच होतं. त्याच्या भोळ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. जवळजवळ तीन वर्षे त्यांने ही भूमिका अखंडपणे साकारली होती. त्याची ही भूमिका लोकांना इतकी भावली की त्याला पाहताच लोक त्याच्या पाया पडत होते. त्याच्या या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक्स मिळत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil joshi played the role of young krishna and kusha prp