कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांनी साकारलेल्या भूमिका, मुलाखतींमध्ये केलेली वक्तव्ये, तर कधी सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या फोटो किंवा रील यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचीदेखील विविध कारणांमुळे चर्चा होताना दिसते. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळते.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून कपाळावर टिकली, गळ्यात मंगळसूत्र आणि केसात गजरा माळला आहे. त्यांचा हा साधा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
“खूप भारी दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव तू माझी गुलीगत मस्ताना…”
महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओला ‘बिग बॉस मराठी ५’ या पर्वात सहभागी झालेला सूरज चव्हाणचा एक डायलॉग आणि त्याला ‘सैराट’ चित्रपटातील गाण्याची जोड दिल्याने मोठी चर्चा होत असल्याचे दिसत आहे. सूरज चव्हाणचा डायलॉग असा आहे, “खूप भारी दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव तू माझी गुलिगत मस्ताना, अगं बया गं” त्याच्यापुढे सैराट या चित्रपटातील “याड लागलं गं, याड लागलं गं” हे गाणं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. तो त्याने तयार केलेल्या यमक जुळणाऱ्या ओळी इतर स्पर्धकांना म्हणून दाखवत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते. त्याबरोबरच सूरज चव्हाणचा खेळ प्रेक्षकांना आवडत असून, त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता यापुढे त्याचा खेळ कसा असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: Video : “तुझ्याबद्दल जे बोललो…”, धनंजय पोवारच्या वक्तव्यावर वैभव चव्हाण म्हणाला, “एक जवळचा मित्र…”
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतून एक्झिट झाल्याचं म्हटलं जात होतं. पण या मालिकेत काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या यांची नव्या भूमिकेतून जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळाली. डॉ. मैथिली सेनगुप्ता या भूमिकेत त्या झळकत आहेत. याबरोबरच सोशल मीडियावरही त्या सक्रिय असतात. नानाविध गाण्यांवर डान्स केलेले त्यांचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळत असतात. चाहत्यांना त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात आवडत असल्याचे दिसते.