‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीला प्रेमाची जाहीरपणे कबुली दिल्याचा ट्रॅक चालू आहे. अक्षरा-अधिपती वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकले असले तरीही अक्षराने हे लग्न मनाविरुद्ध केलेलं असतं. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा असतो. अखेर मास्तरीण बाईंना त्यांच्या प्रेमाची जाणीव होऊन ती अधिपतीसमोर आपलं मन मोकळं करते. आता मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग प्रसारित केला जाणार आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत वटपौर्णिमा विशेष भागासाठी “नवरा हाच हवा…” हे खास गाणं चित्रित करण्यात आलं आहे. नुकतंच हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात वडाची पूजा करून अक्षरा अधिपतीसाठी सुंदर असा डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. निळ्या गडद रंगाची नऊवारी साडी, गळ्यात हटके डिझाइन असलेलं मंगळसूत्र, हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात ‘अहो’ असं लिहिलेली नथ, केसात सुंदर गजरा असा खास लूक अक्षराने या गाण्यासाठी केला होता. अक्षरा-अधिपतीच्या या नव्या गाण्यावर आता अनेक सेलिब्रिटींसह मालिकेचे चाहते रील व्हिडीओ बनवत आहेत.

हेही वाचा : Video : “कसं काय?…” ‘बिग बॉस’ फेम आयशा खानला मराठी भाषेची पडली भुरळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी ऐश्वर्या व अविनाश नारकर हे दोघंही अक्षरा-अधिपतीच्या “नवरा हाच हवा…” या गाण्यावर थिरकले आहेत. नारकर जोडप्याने या वटपौर्णिमा विशेष गाण्यावर सुंदर असा डान्स केला. या दोघांचं सुंदर बॉण्डिंग यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यांच्या या डान्सवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा डान्स पाहून अक्षराची भूमिका साकारणाऱ्या शिवानी रांगोळेने खास कमेंट केली आहे. “So Sweet…” असं लिहित शिवानीने या दोघांचं कौतुक केलं आहे. तर, ऋषिकेश शेलारने यांचा डान्स पाहून कमेंटमध्ये लव्ह इमोजी दिला आहे.

हेही वाचा : Video : “कोण म्हणेल का मराठी गायक आहे म्हणून”, रोहित राऊतने पहिल्यांदाच गायलेलं तमिळ गाणं ऐकून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अक्षरा-अधिपतीला वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीने प्रयत्न चालू केले आहेत. या दोघांच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी ती अक्षरा-अधिपतीला घराबाहेर काढते. आता दहा दिवस अक्षरा-अधिपती कसा संसार करणार? चारुहास त्यांना मदत करणार की नाही? आता येत्या काळात मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.