Amruta Khanvilkar and Sankarshan Karhade Video : ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम सुरू झाल्यापासून अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी दोघं चर्चेत असतात. या कार्यक्रमात दोघं परीक्षकाची जबाबदारी पार पाडत असले तरी दुसऱ्याबाजूला दोघांचे मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी संकर्षण ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमासाठी अमेरिकेला गेला होता. पण तो आता परत आला आहे. यानिमित्ताने अमृताने त्याला काही गोष्टी विचारत होती. मात्र यावेळी संकर्षणने असं काही केलं की अमृता चिडली आणि निघून गेली. नेमकं काय घडलं? पाहा. "संकर्षण कऱ्हाडे परत आला खरं, पण मला याला परत पाठवायचं आहे. काय वाटतं तुम्हाला?", असं कॅप्शन देत अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अमृता उत्साहात म्हणते की, "…आणि संकर्षण परत आला…काय मग संकर्षण? इथलं काय मीस केलंस?" संकर्षण म्हणतो, "मी खरं सांगतो. तुला.म्हणजे तुला सांगतो, इथलं वातावरण खूप मीस केलं. इथलं खाणं खूप मीस केलं. तरीदार मिसळ, लिंबू पिळून, कांदा घालून… ते अमेरिकेला नव्हतं." त्यानंतर अमृता म्हणते, "अरे ते नाही. इथलं (सेटवरचं) असं काय मीस केलंस?" संकर्षण म्हणतो की, मी ना इथलं तुला.म्हणजे तुला सांगतो, इथले चॉकलेट्स फार मीस केले. परीक्षक असल्यामुळे फुकटात मिळतात ना. विमानतळावरती विकत घ्यावे लागतात." हेही वाचा - Video: “तोंड शिवलं होतं का?” धनंजय आणि घनःश्याममध्ये पडली वादाची ठिणगी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरी दणका…” संकर्षणचं हे उत्तर ऐकून अमृता त्याला नीट समजवते. म्हणते, "अरे संकर्षण तू इथलं कोणीतरी सुंदर, गोड असणारी किंवा असणारा असं एखादं व्यक्तिमत्व मीस नाही केलंस का?" अभिनेता म्हणतो, "याचं उत्तर फक्त एक सांगतो मी असं सुंदर, छान असणारं तुला.म्हणजे तुला सांगतो, मला वॉशरुमला जायचं आहे. खूप जोराची आली आहे. पाऊस पडतो आणि आपण त्यात पाणी खूप पितो ना. थांब एका मिनिटात आलो." संकर्षणची ही उत्तर ऐकून अखेर अमृता ( Amruta Khanvilkar ) चिडते आणि म्हणते, "जा बुड, मर त्या पाण्यात…" हे बोलून अमृता निघून जाते. पण तितक्यात संकर्षण येतो आणि म्हणतो, "खरं सांगू. पण सांगू नका. मी अमृताला फार मीस केलं." अमृता व संकर्षणचा व्हिडीओ पाहा हेही वाचा – Video: “इस बार तेरे शहर में, जो सावन आया है…”, अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रदर्शित, तीन तासांत मिळाले फक्त ‘इतके’चं व्ह्यूज Amruta Khanvilkar And Sankarshan Karhade अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) व संकर्षण कऱ्हाडेच्या या मजेशीर व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी संकर्षण कऱ्हाडेला खूप मीस केल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी दोघांच्या बोडिंगचं कौतुक केलं आहे.