Bigg Boss Marathi Nomination Task : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. यंदा या घरात एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी पुरुषोत्तमदादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इरिना, आणि घन:श्याम दरवडे या स्पर्धकांनी आतापर्यंत या घराचा निरोप घेतला. उर्वरित ११ सदस्यांमध्ये आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. अशातच आता या ११ सदस्यांना टक्कर देण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात प्रसिद्ध बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून एन्ट्री झाली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात दर आठवड्यात पहिल्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडतो. साधारणत: सोमवार-मंगळवारीच या आठवड्यात नेमकं कोणं नॉमिनेट होणार? हे प्रेक्षकांसमोर स्पष्ट होतं. या सातव्या आठवड्यात घरात ‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क घेण्यात आला. स्पर्धकांना घरातील अन्य सदस्यांचे फोटो गळ्यात घालून संबंधित स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचावायचं की नाही हा निर्णय घ्यायचा होता.
हेही वाचा : ठरलं तर मग : सुभेदारांच्या घरी खास स्पर्धा! सायली-प्रतिमाने बनवले एकसारखे उकडीचे मोदक, तर प्रिया…; पाहा प्रोमो
नॉमिनेशन टास्कमध्ये फोटो खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत…
अंकिता – जान्हवीचा फोटो
धनंजय – अभिजीतचा फोटो
वर्षा उसगांवकर – धनंजयचा फोटो
अभिजीत – आर्याचा फोटो
आर्या – वैभव चव्हाणचा फोटो
वैभव चव्हाण – अंकिताचा फोटो
पॅडी – अरबाजचा फोटो
जान्हवी – निक्कीचा फोटो
निक्की – पॅडीचा फोटो
अरबाज – वर्षा उसगांवकर यांचा फोटो
‘जादुई दिवा’ हा नॉमिनेशन टास्क खेळताना ‘बिग बॉस’च्या घरात अनेक ट्विस्ट आले. सदस्यांना बझर वाजल्यावर जादुई दिव्याजवळ सर्वात आधी पोहोचणं गरजेचं होतं. एकंदर हा ‘जादुई दिवा’ या नॉमिनेशन कार्यात निर्णायक भूमिका बजावणार होता.
Bigg Boss Marathi : अंकिताचं नेटकऱ्यांकडून कौतुक
आजच्या भागात अंकिताने गुलीगत फेम सूरजसाठी स्टॅण्ड घेतला होता. गेल्या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टन्सी कार्यात जान्हवीने “सूरज कॅपेबल नाही” असं म्हटलं होतं. यावर अंकिता प्रचंड नाराज झाली होती. अखेर आज संधी मिळताच अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलं आणि सूरजच्या वतीने खंबीरपणे बाजू मांडली. मात्र, नॉमिनेशनसाठी वैयक्तिक नव्हे, तर फक्त खेळासंदर्भातील निकष द्यायचे होते. अंकिताने गेमला अनुसरून योग्य कारण न दिल्याने तिचं मतं रद्द करण्यात आलं. तरीही ‘बी टीम’ने शेवटपर्यंत हार मानली नाही. याउलट सूरजची खंबीरपणे बाजू घेतल्याने नेटकरी अंकिताचं भरभरून कौतुक करत आहेत.
अंकिताला वैभवने नॉमिनेट केल्यामुळे ती यंदा नॉमिनेट झाली आहे. तर, सूरज-संग्राम यावेळी सेफ आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये असंख्य प्रतिक्रिया देत सूरजची बाजू घेतल्यामुळे या आठवड्यात अंकिताला सेफ करा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर आणि आर्या जाधव हे सहा सदस्य ( Bigg Boss Marathi ) या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता यांच्यापैकी घरात कोण राहणार आणि कोणता सदस्य या घराचा निरोप घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd