मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे हे दोघंही प्रसिद्धीझोतात आले. कार्यक्रम संपल्यावर काही वर्षांनी दोघांमध्ये चांगली मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मुग्धा-प्रथमेशने गेल्यावर्षी २१ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उपस्थित होती. नुकतेच यांच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मुग्धा-प्रथमेशचं लग्न अतिशय साध्या सुंदर पद्धतीने पार पडल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघांनीही लग्नात मराठमोळा साज, प्रथमेशने पेशवाई लूक, तर मुग्धाने सुंदर दागिने परिधान केले होते. व्याहीभोजन, ग्रहमख, हळद, मेहंदी असे सगळे विधी पार पडल्यावर दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.

हेही वाचा : “शिस्त राहिली नाही, कलाकार १०-१२ तास…”, टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल आनंद इंगळे स्पष्टच बोलले; म्हणाले…

नऊवारी हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने या लूकमध्ये मुग्धा फारच सुंदर दिसत होती. तिचं स्टायलिंग तिची मोठी बहीण मृदुल वैशंपायनने केलं होतं. तर, प्रथमेशने लाल रंगाच्या कुर्त्यावर पुणेरी पगडी असा लूक केला होता. यात एका ठिकाणी मुग्धाचे वडील लेकीच्या लग्नात भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दोघांच्या लग्नाला पाच महिने पूर्ण झाल्याने हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “तुझ्या रूपाने सखा जीवाचा जीवनात या आला गं…” हे गाणं जोडण्यात आलं आहे.

हेही वाचा : Video : “तुरू तुरू चालू नको”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा जबरदस्त डान्स! सर्वत्र होतंय कौतुक

मुग्धा-प्रथमेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती गोड अजिबात शो ऑफ नाही”, “हा व्हिडीओ खरंच एक नंबर आहे”, “दोघांनाही कोणाची नजर लागू नये”, “खूप गोड आणि बाबांच्या डोळ्यात पाणी आलंय”, “किती छान! असेच कायम एकमेकांसोबत रहा” अशा कमेंट्स मुग्धा-प्रथमेशच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : Video : सासू असावी तर अशी! सई लोकूरचं नव्या घरात ‘असं’ केलं स्वागत, शेअर केला गृहप्रवेशाचा व्हिडीओ

मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हे दोघेही जोडीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करतात. दोघांचीही पहिली भेट ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झाली होती. या शोनंतर काही वर्षांनी त्यांचे एकत्र अनेक ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे. पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्यावर्षी ही प्रेक्षकांची लाडकी जोडी लग्नबंधनात अडकली.