‘साथ निभाना साथिया’ या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचे निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘साथ निभाना साथिया’मध्ये त्यांनी जानकी बा मोदी ही भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “धाकधूक होती पण…”, TRP च्या शर्यतीत सिद्धार्थ जाधवच्या ‘आता होऊदे धिंगाणा’ने मारली बाजी! पाहा संपूर्ण यादी

सहकलाकार लवली ससानने अपर्णा यांच्या निधनाची बातमी दिली. लवली ससान आणि अपर्णा यांच्यात जवळचे नाते होते. अपर्णा यांच्या निधनाने लवली ससानला मोठा धक्का बसला आहे. अपर्णा काणेकरच्या आठवणीत लवलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये लवलीने अपर्णा यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत लवलीने लिहिलं, ‘आज माझे मन खूप भरून आले आहे, कारण माझ्या सर्वात जवळची असणारी आणि खऱ्या लढवय्याचे निधन झाले. बा, तू माझ्या ओळखीची सर्वात सुंदर आणि खंबीर व्यक्ती होतीस. सेटवर आपण एकत्र सुंदर वेळ घालवल्याबद्दल मी खरोखर आभारी आहे, हा वेळ मी कधीच विसरणार नाही. माझ्या प्रिय, तुझ्या आत्म्याला शांती लाभो. प्रत्येक जण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझी खूप आठवण येईल, तुझा वारसा सदैव जिवंत राहील.’

अपर्णा कणेकर ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील संपूर्ण टीमच्या खूप जवळ होत्या. २०११ मध्ये त्या ‘साथ निभाना साथिया’मध्ये जानकी बा म्हणून सामील झाल्या. जवळपास पाच वर्ष त्या या मालिकेचा भाग होत्या. अल्पावधीतच त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saath nibhana saathiya serial fame actress aparna kanekar passed away dpj