मराठी मालिकाविश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून आपल्या सहजसुंदर अभिनयाने जुईनं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कोणतीही मालिका असो प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करतात. सध्या जुईची सुरू असलेली ‘ठरलं तर मग’ या मालिकेने लोकप्रियतेचा एक वेगळाच उच्चांक गाठला आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका सुरू झाल्यापासून मराठी मालिकाविश्वातील नंबर-१ मालिका आहे. त्यामुळेच यंदा जुईच्या या मालिकेला महामालिकेच्या पुरस्काराने गौरविण्यातही आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई गडकरीनं साध्या, सरळ स्वभावाच्या असलेल्या सायलीची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका घराघरात पोहोचली असून कल्याणी प्रमाणे सायली सुपरहिट झाली आहे. अशा या लोकप्रिय सायली अर्थात जुई गडकरीच्या काकांना कधी पाहिलंत का? सध्या या काका-पुतणीच्या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांच्या मोठ्या लेकाचं झालं निधन, अभिनेते म्हणाले, “मी त्याच्या इतका तिरस्कार…”

जुई गडकरीनं काल, २२ जूनला तिच्या काकांबरोबर गाणं गातानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं आहे, “जेव्हा तुमच्याकडे काराओके प्रेमी काका असतात…काका पुतणी प्रेम…नक्की बघा…तसंच माइकसाठी चालेली धडपड बघायला विसरू नका.” या व्हिडीओत, जुईचे काका आणि ती किशोर कुमार व आशा भोसले यांचं लोकप्रिय गाणं ‘जाने जा ढूंढता फिर रहा’ हे गाणं गाताना दिसत आहेत. अभिनेते रणधीर कपूर व जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ चित्रपटातील हे गाणं आहे. काका पुतणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: लवकरच लग्नबंधनात अडकणाऱ्या सोनाक्षी सिन्हासाठी मल्लिकाजान मनीषा कोईरालाने दिली खास भेटवस्तू, व्हिडीओ आला समोर

जुई गडकरीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “खूप छान जुई ताई”, “क्या बात है”, “आवाज खूप छान आहे”, “आमच्याकडेही काराओके प्रेमी काका आहेत”, “खूप सुंदर…अप्रतिम”, “तुमच्या दोघांचा आवाज खूप मस्त आहे”, “गोड आवाज”, अशा अनेक प्रतिक्रिया जुईच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tharala tar mag fame jui gadkari sing kishore kumar and asha bhosle popular song with her uncle pps
First published on: 23-06-2024 at 12:18 IST