स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या अव्वल स्थानावर आहे. कमी वेळातचं या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत अर्जुन सुभेदारचं पात्र साकारणार अभिनेता अमित भानुशालीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलाय. अमितच्या अभिनयाचं कौतुक तर सगळीकडे होतंच पण याचबरोबरच त्याच्या रील्सची चर्चादेखील सध्या सगळीकडे सुरू आहे.

अमित सोशल मीडियावर सक्रिय कायम असतो आणि मालिकेच्या सेटवरील धम्माल मस्ती तसेच डान्सच्या रील्स तो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच अमितने त्याच्या बायकोबरोबर म्हणजेच श्रद्धाबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा… अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचं ब्रेकअप? पाच वर्षांच्या नात्यानंतर वेगळं होणार हे जोडपं? चर्चांना उधाण

अक्षय कुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस खिलाडी’ या चित्रपटातील ‘मै हू एक कुंवारा’ या गाण्यावर सुरूवातीला अमित थिरकताना दिसतोय. तेवढ्यातच त्याची पत्नी श्रद्धा येऊन त्याला धडकते आणि अमित तिला घाबरून म्हणतो, “की मी फक्त रील बनवत होतो.” तेवढ्यात त्याची पत्नी त्याला सांगते, “की या गाण्याऐवजी ‘मेरी बीवी नंबर वन’ या गाण्यावर रील बनव”

अमितने या व्हिडीओला मजेशीर कॅप्शन देत लिहिलं, “अजून करा बायकोबरोबर रील…” अमित आणि त्याच्या पत्नीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओवर प्रेक्षक आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, “हो भावा तुझीच बायको नंबर वन आहे. तिच्यासारखं दुसरं कोणीच नाही.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमची जोडी खरंच खूप भारी आहे.”

हेही वाचा… चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हो वहिनी हेच बरोबर आहे. कोणीच कुमारिका अमितला आता मिळणार नाही.” तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट केली आहे.

हेही वाचा… “जिंदगी का इतना भी तमाशा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला घ्यायला आला इम्तियाज अली; अभिनेत्याने शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, अमित भानुशालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अमित सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय. याआधी अमितने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्येदेखील काम केलंय. अमित काही चित्रपटांमध्येही झळकला आहे.