लोकसत्ता टीम
नागपूर: पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ मध्ये दंगल झाली होती. याप्रकरणी आयोगासमोर चौकशी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस सोबतच २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे, अशी विनंती आयोगाला लिहलेल्या पत्राद्वारे केली आहे.
आणखी वाचा- वाशिम: रात्री १ वाजता येणारी मुंबई एक्सप्रेस पोहचली ३ वाजता; प्रवाशांना मन:स्ताप
यासंदर्भात पत्रकारांशी विचारणा केली असता रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी सूचना केली असली तरी कोणाला चौकशीसाठी बोलावावे हा अधिकार आयोगाचा आहे. पण जर आयोगाने फडणवीस यांना बोलावले तर ते नक्कीच जातील. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी संपूर्ण राज्यात शांतता ठेवण्याचे काम केले.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Calling fadnavis for questioning in the bhima koregaon case everyone is shocked by athavales reasoning rbt 74 mrj