नागपूर: भाजपच्या पाठिंब्यावर अस्तित्वात आलेल्या शिंदे सरकारचे स्टेअरिंग भाजपच्या हाती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याची टीका विरोधक नेहमी करतात. पण रविवारी समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

११ डिसेंबरला समृध्दी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर- शिर्डी पर्यतच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाचा पाहणी दौरा नागपूरपासून सुरू झाला. त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे एकाच गाडीतून दौ-यासाठी दु १२.४० च्या सुमारास निघाले. त्यावेळी फडणवीस गाडी चालवत होते. रस्याचे काम सुरू असताना शिंदे यांनी या मार्गावर गाडी चालवली. आता मी चालवत आहे, असे फडणवीस म्हणाले. या पाहणी दौ-यात रस्ते विकास महामंडळ, महसूल, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspecting samrudhi highway steering of cm eknath shinde car in hands of dcm devendra fadanvis nagpur tmb 01
First published on: 04-12-2022 at 13:18 IST