Premium

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार

वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

Sudhir Mungantiwar comment wagh nakh
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत, ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पोलीस विभागातील लाचखोरीत घट; महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार

मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला. यावेळी मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करून काम करीत असल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून जेव्हा ब्रिटनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आमदार पराग अळवणी यांनीही मनोगत व्यक्त करून मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहे.

हेही वाचा – “‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील तिन्ही पक्षांत तिजोरी लुटण्याची स्पर्धा”, वडेट्टीवार यांची टीका; म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.

मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudhir mungantiwar commented on wagh nakh going to london for chhatrapati shivaji maharaj wagh nakh is a proud moment he said rsj 74 ssb

First published on: 02-10-2023 at 09:33 IST
Next Story
पोलीस विभागातील लाचखोरीत घट; महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार