गडचिरोली: भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक; सत्याग्रह आंदोलनाने राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द कण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

gadchiroli satyagrah movement
गडचिरोली: भाजपविरोधात काँग्रेस आक्रमक; सत्याग्रह आंदोलनाने राहुल गांधींवरील कारवाईचा निषेध

न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेनंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द कण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवारी गांधी चौकात काँग्रेस व समविचारी पक्षाच्या नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन करून भाजपचा निषेध नोंदविला.भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि हिडनबर्ग संस्थेने उघड केलेल्या अदानी समूहाच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला. त्यांचा आवाज दाबण्याकरिता नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सत्तेचा दुरुपयोग करत खासदारकी रद्द केली, असा आरोप यावेळी नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा >>>“लोकांना सांगतो, पटलं तर मत द्या, नाहीतर…”, नितीन गडकरींचं नागपुरात विधान

सोबतच नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला काँग्रेस अध्यक्ष कविता मोहरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसाण, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, नंदू नरोटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 15:52 IST
Next Story
वाशीम: शिक्षकाच्या आत्महत्येस जबाबदार संस्थाचालक, मुख्याध्यापकावर कारवाई करा; न्यायासाठी नागरिकांचा मोर्चा
Exit mobile version