scorecardresearch

“लोकांना सांगतो, पटलं तर मत द्या, नाहीतर…”, नितीन गडकरींचं नागपुरात विधान

नितीन गडकरींच्या वक्तव्याने ते राजकारणातून निवृत्ती घेणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

nitin gadkari
"लोकांना सांगतो, पटलं तर मत द्या, नाहीतर…", नितीन गडकरींचं नागपुरात विधान

नागपूरमध्ये रविवारी ( २६ मार्च ) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

“लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. कोणतरी नवीन येईल,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : “…म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला”, सुहास कांदेंचा मोठा गौप्यस्फोट

“राजनीती म्हणजे लोकनिती, धर्मनीती…”

“राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीती म्हणजे लोकनीती, धर्मनीती आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,” असंही नितीन गडकरांनी सांगितलं.

हेही वाचा : “तुमची ५२ काय १५२ कुळं खाली उतरली, तरी…”, उद्धव ठाकरेंच्या विधानावर बावनकुळेंचा पलटवार; म्हणाले…

“मी प्रेमाने नाहीतर ठोकून…”

“जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर, या क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करत आहे. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यातही याच क्षेत्रात जोमाने काम करणार. कारण, याने भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागाचाही चेहरामोहरा बदलू शकतो,” असेही नितीन गडकरींनी म्हटलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 12:32 IST

संबंधित बातम्या