Premium

भक्तीमय वातावरणात, गुलाल उधळत नागपुरात दीड लाखांवर गणपती मूर्तीचे विसर्जन

गुरुवारी दुपारनंतर नागपुरात ढोल ताशांच्या निनादात विसर्जनाला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत दीड लाखाच्यावर गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

Visarjan one and a half lakhs Ganapati idols Nagpur
भक्तीमय वातावरणात, गुलाल उधळत नागपुरात दीड लाखांवर गणपती मूर्तीचे विसर्जन (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नागपूर: गणरायाच्या विसर्जनाला गुरुवारपासून सुरुवात झाल्यानंतर शहरातील सर्व कृत्रिम विसर्जन कुंडांवर एकूण १ लाख ४४ हजार १६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. याशिवाय ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आले असून येथे आतापर्यंत २७० मोठ्या मूर्ती विसर्जीत करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, एकूण विसर्जीत १ लाख ४४ हजार १६९ मूर्तींमध्ये १३७११० मूर्ती मातीच्या तर प्लास्टार ऑफ पॅरिसच्या ७ हजार ०५९ मूर्तींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपती विसर्जनासाठी शहरातील दहाही झोनमध्ये विविध तलावाच्या ठिकाणासह विविध भागात मैदानात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली. गुरुवारी दुपारनंतर नागपुरात ढोल ताशांच्या निनादात विसर्जनाला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत दीड लाखाच्यावर गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

हेही वाचा… केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात नोकरी; १ लाख ५१ हजार महिना पगार, त्वरित अर्ज करा

नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील दहा झोनमधील २११ ठिकाणी ४१३ कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय मनपाद्वारे विशेष १४ निर्माल्य रथांची व्यवस्था करण्यात आलेली असून या रथाद्वारे गणेशोत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांकडून श्रद्धापूर्वक निर्माल्य संकलीत करण्यात आले. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Visarjan of one and a half lakhs ganapati idols in nagpur vmb 67 dvr

First published on: 29-09-2023 at 17:32 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा