पनवेल : खारघर उपनगरातील बँकेतून रोख रक्कम घेऊन घरी जाणाऱ्या ग्राहकांना लुटण्याच्या दोन घटना महिन्याभरात घडल्या. यामुळे चोरट्यांनी बँक ग्राहकांना लक्ष्य केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिली घटना १३ नोव्हेंबरला घडली. यामध्ये सेक्टर १२ येथील कॅनरा बँकेतून ६९ वर्षीय वृद्ध दोन लाख रुपये घेऊन पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रकमेची पिशवी हिसकावून तेथून पोबारा केला होता. दुसरी घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली.

हेही वाचा…गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात

सेक्टर ११ येथील साईशास्त्र सोसायटीत राहणारे ७२ वर्षीय वृद्ध सेक्टर १२ येथील स्टेट बँकेतून दोन लाख तीस हजार रुपयांची रक्कम घेऊन ते राहत असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश करत असताना ३० ते ३५ वयोगटाचे दोन तरुण दुचाकीवर त्यांच्याजवळ आले. चोरट्यांनी पीडित वृद्धाच्या डोळ्यावर फटका मारुन त्यांना जमिनीवर पाडले आणि रोख रकमेची पिशवी पळविली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two robberies of customers carrying cash from bank occurred within month in kharghar sud 02