आज नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सरकार सर्वसामान्य सरकार असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे , असे म्हणत गेल्या अडीच वर्षात सत्तेसाठी झालेली चूक ती आम्ही दुरुस्त केली असे प्रतिपादन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उरण : चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. हे सरकार घेणारे नसून देणारे आहे. हे सरकार दुजाभाव करीत नाही तरवसर्वांना सोबत घेऊन काम करीत आहोत. यावेळी त्यांनी अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी केलेला संघर्ष आणि त्यातून उभी राहिलेली माथाडी संघटना, कायदा माथाडी चळवळ उभी करून माथाडी कामगार यांना न्याय दिला आहे. माथाडी कामगारांच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. माथाडी कामगार घरांसाठी १५० कोटी दिले आणखीन २०० कोटी निधी दिला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिली. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा >>> नवी मुंबई : सुट्टीच्या दिवशीही वाहतूककोंडी पिच्छा सोडेना !!!

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० हजार मराठा उद्योजक निर्माण झाले आहे. हे काम सातत्याने सुरू राहिले असते यर आणखीन अडीच लाख मराठा उद्योजक निर्माण झाले असते. असे त्यांनी यावेळी सांगितले.

माथाडीचा गैरफायदा घेणाऱ्या वसुली सम्राटांवर गुन्हे
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडीच्या नावावर वसुली करणाऱ्यांमुळे माथाडी संघटना अडचणीत येत आहे, अशी माहिती दिली यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती, त्याचा गैरफायदा घेणाऱ्या अशा वसुली सम्राटांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. त्यांनी यावेळी सांगितले की २०१४ पासून २०१९ पर्यंत या पाच वर्षांच्या काळात माथाडी कामगारांचे विविध प्रश्न सोडवले आहेत . वडाळा येथील घरांचे प्रश्न नियमांच्या बाहेर जाऊन सोडवले आहेत. तसेच आमच्या कालावधीत स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली. यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठ्यांना उद्योजक बनवण्यासाठी २५० ते ३०० कोटी निधीची आवश्यकता आहे ,अशी मागणी केली होती. यया मागणीची ही पूर्तता करण्यात येईल. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : रविवारी माथाडी कामगारांचा भव्य मेळावा , मेळाव्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

आर्थिक विकास महामंडळ जबाबदारी पुन्हा नरेंद्र पाटीलांकडे
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मंडळाचे अध्यक्षपद पुन्हा नरेंद्र पाटील यांच्याकडे द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हे नरेंद्र पाटील असतील अशी घोषणा केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० हजार मराठा उद्योजक निर्माण झाले आहे. हे काम सातत्याने सुरू राहिले असते यर आणखीन अडीच लाख मराठा उद्योजक निर्माण झाले असते. बाळासाहेब ठाकरे यांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा असे सांगितले होते ते आज सत्यात उतरत आहे असे मत मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केले.

नरेंद्र पाटलांची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
यावेळी नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना म्हणाले की , या आधी मी तुम्हाला कधी जाणून घेतले नाही किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता आला नाही . मात्र जेव्हा धर्मवीर आनंद दिघे चित्रपट पाहिला तेव्हा समाजासाठी असलेले तुमचे कार्य समजले . खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे विचारांचे तुम्ही खरे वारसदार आहात. अशी स्तुती यावेळी नरेंद्र पाटील यांनी केली. तापोळा खोऱ्यातील साताऱ्याचा वाघ मुख्यमंत्री झाला आहे. म्हणजे आम्हाला ही भरभरून मिळणार आहे. माथाडी कामगारांसाठी मागणे हे आमचे काम आहे आणि राज्यसरकारच काम द्यायचं आहे. वाशी येथील ट्रक टर्मिनस पाडण्यात आले तिथे माथाडी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत. तसेच कोरोना काळात करोनामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांवर जो अन्याय झाला आहे , हे सरकार त्यांना न्याय देईल अशी अपेक्षा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We corrected the mistake made for power chief minister eknath shinde amy
First published on: 25-09-2022 at 16:08 IST