-
५६ वर्षाचा होऊनही आजही बॉलिवूडच्या भाईजान सलमानच्या फिटनेसपुढे कित्येक स्टार्स फिके पडतात.
-
बॉडीबिल्डिंगचं वेड चित्रपटसृष्टीत संजय दत्तने आणलं आणि पुढे त्याचं स्टाइल स्टेटमेंट सलमान खानने केलं. आजही इंडस्ट्रीतील कित्येक अभिनेते हे सलमानकडून खास प्रशिक्षण घेतात.
-
सलमान त्याच्या फिटनेसकडे खूप बारकाईने लक्ष देतो. आज आपण त्याच्या या फिटनेसमागचं रहस्य जाणून घेणार आहोत.
-
सलमानचा फिटनेस ट्रेनर राकेश उदियार याने नुकतंच सलमानच्या या फिटनेसमागचं रहस्य आणि त्याच्या डायट प्लानबद्दल उलगडून सांगितलं आहे. राकेश सलमानबरोबर २०१० पासून काम करत आहे.
-
सलमान सकाळी उठल्या उठल्या प्रथम कार्डियो करतो, आणि याची सवय त्याने त्याच्या तरुण वयातच लावून घेतली होती.
-
कार्डियोनंतर सलमान एक तास वेट ट्रेनिंग करतो, ज्यामुळे त्याची बॉडी ही आणखीन पिळदार होते.
-
याबरोबरच सलमान हायकिंग सेशनवरही बऱ्यापैकी जोर देतो.
-
सलमान प्रत्येक व्यायाम प्रकाराचे ५ सेट्स आणि २० रिपीटेशन करतो.
-
एवढं हेवी वर्कआऊट करत असला तरी आठवड्यातून एक दिवस सलमान शरीराला आरामही देतो.
-
व्यायामाबरोबर सलमान त्याच्या आहाराचे नियमही काटेकोरपणे पाळतो. मीडिया रीपोर्टनुसार सलमान नाश्ता करताना अंड्याचा पांढरा भाग आणि लो फॅट असलेलं दूध घेतो.
-
सलमानच्या दुपारच्या जेवणात ग्रील्ड व्हेजिटेबल्स, रोटी आणि सलाड यांचा समावेश असतो. याबरोबरच रात्री सलमान जास्त जेवण घेत नाही. मासे, सूप किंवा अंडी असा रात्रीचा हलका आहार सलमान घेणं पसंत करतो.
-
व्यायाम आणि आहार योग्य प्रमाणात ठेवणारा सलमान स्वतःला कायम स्टीरॉईडसारख्या कृत्रिम गोष्टींपासून लांब ठेवतो. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
Photos : ५६ वर्षाचा होऊनही दबंग सलमान खान आजही आहे तितकाच फिट; जाणून घ्या त्याच्या फिटनेसमागचं रहस्य
बॉडीबिल्डिंगचं वेड चित्रपटसृष्टीत संजय दत्तने आणलं आणि पुढे त्याचं स्टाइल स्टेटमेंट सलमान खानने केलं.
Web Title: Do u know bollywood superstar salman khan fitness secret diet plant workout pattern avn