-
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात, देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भाविक उपवास करतात, पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारे तिची उपासना केली जाते.
-
या दिवसांत देवीला शृंगार अर्पण करणे देखील अतिशय शुभ मानले जाते. विवाहित महिला देवीला सौंदर्यप्रसाधने अर्पण करतात. ही वर्षानूवर्षे जुनी परंपरा आहे जी हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची मानली जाते. या कृतीतून महिलांनाही आनंद मिळतो.
-
१६ अलंकार (शृंगार)
सोळा अलंकारांमध्ये लाल रंगाचे वस्त्र, बांगड्या, कुंकू/टिकली, काजळ, मेहंदी, गजरा, मंगळसूत्र, नथ, जोडवी, कानातले, कपाळ टिक्का, बाहुल्या, कंबर पट्टा, कंगवा, लांबसा, आणि आरसा अशा १६ अलंकारीक वस्तू नवरात्रीत तुम्ही दुर्गा मातेला अर्पण करु शकता. -
५ किंवा ७ वस्तूही अर्पण करता येतात
जर तुम्हाला देवीला सौभाग्य- शृंगाराच्या पाच-सात वस्तू अर्पण करायच्या असतील तर तुम्ही लाल रंगाचे वस्त्र, टिकली, कुंकू, मेहंदी आणि लाल बांगड्या यांची निवड करु शकता. देवीला सात वस्तू देखील अर्पण केल्या जातात. यासाठी, तुम्हाला या पाच वस्तूंव्यतिरिक्त काजळ आणि पायांची जोडवी निवडता येतील. -
उत्स्वानंतर अर्पण केलेल्या वस्तूंचं काय करायचं?
दरम्यान, नवरात्रौत्सव संपल्यानंतर देवीला अर्पण केलेल्या या वस्तूंचं काय करायचं? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर तुम्ही या वस्तू देवीच्या मंदिरात दान करू शकता. याशिवाय, तुम्ही या वस्तू विवाहित महिलेला भेट स्वरूपातही देऊ शकता. -
स्वत: साठीही ठेवा
दरम्यान, देवीला अर्पण केलेल्या या १६ वस्तूंपैकी काही वस्तू तुम्ही स्वतःसाठीही ठेऊन घेतल्या पाहिजेत. असे करणे म्हणजे दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त करणे, असे मानले जाते. -
देणगी द्यावी
ज्योतिषी सांगतात की देवीला अर्पण केलेल्या या वस्तू तुम्ही इतरांना देत असाल तर त्याबरोबर एक छोटीशी का असेना देणगी (रक्कम)दिली पाहिजे. -
खरेदी पर्याय
या वस्तू तुम्हाला बाजारातही मिळतील तसेच या वस्तू आता ऑनलाईनही उपलब्ध आहेत. माता राणी शृंगार किट किंवा दुर्गा माता शृंगार असे गूगल सर्च केले तर या वस्तू अॅमेझॉनवरुन तुम्हाला खरेदी करता येऊ शकतील. -
या वस्तू टाळाव्यात
जाणकार ज्यातिषींच्या मते देवीला शृंगार अर्पण करताना लिपस्टिक, पावडर, आयलायनर, नेलपॉलिश या वस्तू अर्पण करु नयेत. रसायनांपासून बनवल्या जाणाऱ्या या वस्तूंचा धर्मग्रंथांमध्ये कुठेही उल्लेख नाही.
हेही पाहा- जगायचं असेल तर लढावं लागेल! साप आणि मुंगूस यांच्यातल्या वैराचं कारण माहितीये का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य…
देवीला १६ शृंगार अर्पण करताना ‘या’ वस्तू कटाक्षाने टाळाव्यात, नवरात्रौत्सवानंतर देवीच्या या वस्तूंचं काय कराल?
Shardiya navratri 2025: यंदाच्या नवरात्रीला काहीच तास शिल्लक आहेत. सगळीकडे दुर्गा मातेच्या या सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या ९ दिवसांमध्ये देवीला सौंदर्यप्रसाधने अर्पण करण्याचीही परंपरा चालत आलेली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात…
Web Title: Shardiya navratri 2025 know right 16 shrungar items for maa durga to please during festival in marathi spl